Wednesday, April 24, 2024
Homeनगर‘ही’ कारवाई म्हणजे बळीचा बकरा !

‘ही’ कारवाई म्हणजे बळीचा बकरा !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातील (Civil Hospital) आगीची दुर्घटना (Fire Accident) ही दुर्दैवीच आहे. त्यात मृत्यू पावलेल्या कुटूंबियांप्रती सर्वांच्याच दु:खद भावना आहेत. या घटनेस जे जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई (Action) झालीच पाहिजे. परंतु तातडीने व घाईघाईत निर्णय घेऊन वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), परिचारिकांवर (Nurse) झालेली कारवाई म्हणजे त्यांना बळीचे बकरे बनविले आहे, असा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे (BJP City District President Bhaiya Gandhe) यांनी कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनाला पाठिंबा (Support the Strike) दिला.

- Advertisement -

या वेळी गंधे (Bhaiya Gandhe) म्हणाले की, तांत्रिक बिघाडामुळे ही आग (Fire) लागली असून, त्याचा आणि वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) किंवा परिचारीकांचा काहीही संबंध नाही असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेचे तज्ञांमार्फत चौकशी (Investigation) करुन खर्‍या दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारवाई करुन निलंबित (Suspended) केलेले वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) व परिचारिकांनी (Nurse) आपल्या कामात कसुर केला असेल तर कारवाई होणे अपेक्षित होते. ज्यांच्यावर कारवाई केली, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कारवाईचा आम्ही निषेध (Protest) करत असल्याचे गंधे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या