Sunday, April 28, 2024
Homeनगरखांडगाव येथे भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा

खांडगाव येथे भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा

करंजी (वार्ताहर)-

पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथे दरवर्षीप्रमाणे भैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

- Advertisement -

करण्यात आले असून यानिमित्ताने येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. खांडगाव येथे रविवार (दि. 6) पासून या कीर्तन महोत्सवास सुरूवात होत असून पहिल्याच दिवशी सकाळी 10 वाजता समाजप्रबोधनकार निवृत्ती महारात इंदोरीकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.

सोमवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत संगीत भजनाचा कार्यक्रम होऊन रात्री 9 वाजता अंकुर महाराज साखरे यांचे हरी कीर्तन होईल. त्यानंतर मंगळवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाने या जन्म उत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे. हा जन्मोत्सव सोहळा खांडगाव येथील नियोजित भैरवनाथ मंदिर उभारणी स्थळ येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी खांडगाव, लोहसर, वैजूबाभळगाव, जोहारवाडी, पवळवाडी राघोहीवरे, भोसे या ग्रामस्थांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खांडगाव येथे अतिशय भव्य दिव्य असे काळभैरवनाथ मंदिर उभारण्याचे नियोजन या परिसरातील भाविकांनी केलेले आहे.

या जन्मोत्सव सोहळा व कीर्तन महोत्सवास परिसरातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खांडगाव ग्रामस्थांनी केले आहे. या कीर्तन महोत्सवासाठी मृदंगाचार्य राजाराम महाराज देवडकर, भजन सम्राट रविराज महाराज पवार, संगीत विशारद महेश महाराज मडके यांच्यासह अनेक संत-महंत वारकरी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या