नाशिक मनपा प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्तांकडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त पदाचा तिढा तसाच कायम असून विभागीय महसूल आयुक्तांनंतर जिल्हाधिकारी यांचे नंतर तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी आयुक्त म्हणून अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्याकडे तो सुपूर्त करण्यात आला आहे.

नाशिक मनपाचे प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांचे कडून ही जबाबदारी आता मनपा अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बाणायत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी देखील रजेवर गेल्याने शासनाने शुक्रवारी रात्री आदेश काढत हा प्रभार बाणायत यांच्याकडे दिला. मागील पंधरा दिवसात तिसर्‍यांदा प्रभार बदलण्यात आला आहे.

.

डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार मसुरीला प्रशिक्षणाला गेल्याने त्याचा प्रभार महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे देण्यात आला होता. डाॅ.पुलकुंडवार प्रशिक्षण संपवून परतण्यापुर्वीच तीन जूनला त्यांची बदली पुणे येथील साखर आयुक्त पदावर करण्यात आली. त्यामुळे नवीन आयुक्तांची नियुक्ती होइपर्यंत हा प्रभार गमे यांच्याकडे कायम ठेवण्यात आला. पण गमे हे आठ जूनपासून रजेवर गेल्याने शासनाच्या नगरविकास विभागाने हा प्रभार जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांच्याकडे सोपवला होता.

आता जिल्हाधिकारी देखील रजेवर गेले आहेत. त्यामुळे हा प्रभार शुक्रवारी (दि.१६) रात्री अतिरिक्त आयुक्त बाणायत यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे आदेश शासनाने काढले. मागील पंधरा दिवसात आयुक्त पदाचा प्रभार तीनदा बदलण्यात आला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *