Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपंजाबचे मुख्यमंत्री पुन्हा चढले बोहल्यावर; जाणून घ्या, गुरप्रीत कौर कोण आहेत?

पंजाबचे मुख्यमंत्री पुन्हा चढले बोहल्यावर; जाणून घ्या, गुरप्रीत कौर कोण आहेत?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann wedding) आज विवाहबंधनात अडकले. पंजाबच्या इतिहासात पदावर असताना लग्न करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

भगवंत मान यांनी डॉ. गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) यांच्याशी लग्न केलं. मान यांचे हे दुसरे लग्न असून चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानी हे लग्न झाले.

- Advertisement -

भगवंत मान आणि गुरप्रीत कौर यांनी साधेपणे आणि मोजक्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये हे लग्न केले.

गुरप्रीत कौर कोण आहेत यांच्याबद्दल सोशल मीडिया वर चर्चा सुरू आहेत. गुरप्रीत कौर यांचं कुटुंब कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पेहोवा नगरातील आहेत.

गुरप्रीत कौर उच्चशिक्षित आहेत. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी अंबाला स्थित महर्षी मार्कंडेयश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च मधून MBBS केलं आहे. तिथेही त्या कायम टॉपर होत्या.

दरम्यान भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीचं नाव इंद्रजीत होतं. भगवंत मान पहिल्या लग्नातून दोन मुलं आहेत. ते अमेरिकेत राहतात. २०१६ मध्ये भगवंत मान आणि इंद्रजीत यांनी घटस्फोट घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या