Saturday, April 27, 2024
Homeजळगावभगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील सकल जैन श्री संघातर्फे आज रविवारी श्रमण भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. शहरातील दादावाडी येथील सर्वात जुन्या मंदिरात सर्व 4 संघाच्या फक्त 4 प्रतिनिधीच्या उपस्थितीत सकाळी ध्वजारोहण झाले.

- Advertisement -

या ध्वजारोहण सोहळयाचेे तसेच सालाबादप्रमाणे संपन्न होण्यार्‍या जन्मकल्याणक महोत्सवाच्या मुख्य समारोहाचे ऑनलाईन प्रसारण झाले.

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्ताने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

या महोत्सवात रक्तदान शिबिर, ऑनलाईन स्पर्धा तसेच भजनसंध्या अशा विविध कार्यक्रम पार पडले. आज रविवारी श्रमण भगवान महावीर यांच्या जयंती साजरी करण्यात येवून या महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

जन्मकल्याणक महोत्सवात 24 एप्रिल रोजी भारती रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली सदा ज्ञान भक्ती गान मंडल यांच्या माध्यमातून ऑनलाईन भजन संध्या आयोजन करण्यात आले.

समारोहाला युवाचार्य प्रवर महेंद्रऋषी जी म. सा. यांचे मार्गदर्शन लाभले. समारोहा दरम्यान संघप्रमुख दलीचंद जैन, भागचंद वेदमुथा, माणकचंद बेद, राजेश श्रावगी तथा संघ मार्गदर्शक समाजचिंतामणी सुरेशदादा जैन, ईश्वरबाबू ललवाणी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, प्रदीप रायसोनी यांचे शुभकामना संदेश देण्यात आले. याप्रसंगी संपुर्ण वर्षात जैन समाजातुन देहदाना करण्यात आलेल्या 3 (तीन) परिवाराचे एवं कोरोना महामारी दरम्यान सेवा देणार्‍या संस्थेचा गौरव करण्यात आला.

141 बॅग रक्तसंकलन, 10 प्लाझ्मा दान

जन्मकल्याणक निम्मत सामाजिक दायित्वा पोटी सकल जैन श्री संघ, जळगाव जैन सोशल ग्रुप गोल्ड, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 ते 25 एप्रिल दरम्यान कांताई सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबिराला भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनचे सहर्ष सहयोग मिळाले. या शिबिराचाही आज समारोप झाला.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी नगरसेवक अमरभाऊ जैन हे मान्यवर उपस्थित होते. पाच दिवसात एकूण 141 बॅग रक्तदान एवं 10 प्लाझ्मा दान करण्यात आले.

सर्व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष दलुभाऊ जैन यांच्या मार्गदर्शना खाली माजी नगरसेवक अमर जैन, संजय रेदासनी, विशाल चोरडीया, प्रियेश छाजेड, आनंद श्रीश्रीमाल, मुकेश सुराणा, सचिन चोरडीया, नरेंद्र बंब, अनिल पगारिया, सौ. हर्षाली पारख, विपीन चोरडीया, अमोल श्रीश्रीमाल, सचिन बाफना, किशोर चोपडा आदीनी परिश्रम घेतले

- Advertisment -

ताज्या बातम्या