Thursday, April 25, 2024
Homeनगरमहंत शास्त्री, पंकजा मुंडे-धनजंय मुंडे एकाच व्यासपिठावर

महंत शास्त्री, पंकजा मुंडे-धनजंय मुंडे एकाच व्यासपिठावर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

संत भगवानबाबा माझे आदर्श आहेत.मी भगवानगडाची पायरी आहे. भगवानगडावरून राजकारण नको हा गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांचा आदेश शिरसावंद्य मानला. गोपीनाथ गड स्थापन करून त्याचे लोर्कापण महंत डॉ.नामदेवशास्त्री यांच्या हस्ते केले. महंत व गडाला कुठलाही धक्का लागु नये म्हणुन हिरकणी सारखी बाहेर पडले. आता तो विषय संपला. पंकजा मुंडे जिवंत असेेपर्यंत भगवानगड व गडाच्या गर्दीला कुठलीही अडचण येणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.

- Advertisement -

तालुक्यातील भारजवाडी येथे भगवानगडाचा 89 व्या नारळी सप्ताहाची सांगता गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्या किर्तनाने सांगता झाली. त्यानंतर उपस्थितांसमोर माजी मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. सप्ताहाच्या निमीत्ताने अनेक वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आलेले भगवानगडाचे महंत डॉ.नामदेवशास्री, माजी मंत्री पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात हा धार्मिक कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरवातीलाच शुभेच्छा देवुन भगवानगडाच्या सप्ताहाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला द्यावी अशी महंताना विनंती करून ते जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी निघून गेले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय व माझ्यात काहींनी लावालावी केली. ती मला माहित नाही मात्र माझ्यासाठी जनता महंत आहे. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. दहा योद्धे एका चांगल्या योध्याचा बळी घेतात. भगवानबाबांच्या गादीची मी कधी अप्रतिष्ठा करणार. केली तर मान कापून ठेवेल. भगवानगडाला माझ्या वतीने धनुभाऊ मदत करेल.गडावर भगवानबाबांची शंभर फुटी मुर्ती बसवा त्या कामासाठी मी गवंडी काम करेल असे पंकजा मुंडे शेवटी म्हणाल्या.

धनंजय मुंडे म्हणाले, घरातील माणसामध्ये संवाद असावा असे वाटत होते. ते आज घडले आहे. माझ्यात व पंकजात सुई च्या टोका एवढेही सुधा मतभेद नाहीत. गडाच्या बाबतीत जी जबबदारी असेल ती बहिणभाऊ म्हणून आम्ही ती पार पाडू. आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे झाल्याने दोघेही आमदार मंत्री झालो.एकत्र असतो तर असे घडले असते का असे शेवटी मुंडे म्हणाले.

यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे, अरुण मुंडे, माणिक खेडकर, अभय आव्हाड, डॉ.मनोरमा खेडकर,अ‍ॅड. प्रताप ढाकणे, गोकुळ दौंड, अजय रक्ताटे, शिवशंकर राजळे, अमोल गर्जे, संजय किर्तने,वामन किर्तने, पिराजी किर्तने, नितीन किर्तने,सरपंच माणिक बटुळे, बाळासाहेब बटुळे यांच्यासह भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चमचे हरामखोर..

महंत डॉ.नामदेवशास्त्री म्हणाले, पंकजाशी माझे वैर नाही मात्र तिच्या जवळचे चमचे हरामखोर आहेत. पंकजाने आपला अहंकार कमी करावा असा सल्ला त्यांनी दिला. तीन वर्षानंतर भगवानगडाला उत्तराधिकारी नेमणार असुन महंतपद सोडणार असल्याचे सुतेवाच त्यांंनी केले. एखाद्याने गडासाठी पैसे दिले नाही तरी चालेल मात्र कोणी चमचा नेला तर मी जोड्याने ठोकेल. दोन्ही भावंडाना उज्वल भविष्य आहे तुम्ही दोघांनीही मोठी भरारी घ्यावी अशी आपली इच्छा आहे असेही महंत यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या