Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभगतसिंह कोश्यारींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, जबरदस्तीने त्यांना...

भगतसिंह कोश्यारींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, जबरदस्तीने त्यांना…

मुंबई | Mumbai

भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) होते, त्यावेळी महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.

- Advertisement -

त्यानंतर कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींना (PM Modi) पत्र लिहून आपल्याला राज्यपालपदावरून मुक्त करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. यानंतर राष्ट्रपतींनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर करत त्यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैंस (Ramesh Bais) यांची नियुक्ती केली आहे. त्यातच आता राज्यपालपदावरून मुक्त झालेल्या कोश्यारींनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेनमध्ये दाखल, चर्चांना उधाण…

यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसतानाही त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्रीपदावर बसविण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP) नेत्यांनी ठाकरेंना बळीचा बकरा बनवलं. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंनी मला विमानातून खाली उतरवलं, विधात्याने त्यांना सत्तेतून खाली खेचलं, असा टोलाही भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरेंना लगावला.

निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे कडाडले

तसेच पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यांनी यापासून लांब राहावं, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, त्यांनी संघटना चालवायला पाहिजे होती. उद्धव ठाकरेंना सुळीवर चढवण्यात आलं. मला त्यांच्यावर दया येते, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

कार-ट्रकचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या