Friday, April 26, 2024
HomeनाशिकNashik Crime : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; फरार संशयित ताब्यात

Nashik Crime : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; फरार संशयित ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भद्राकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) बिहार (Bihar) येथून अल्पवयीन मुलीस लग्नाचे प्रलोभन दाखवून अत्याचार करून पळून गेलेल्या संशयितास जेरबंद (Imprisoned) केले आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात (Court) हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयिताने (Suspect) १९ फेब्रुवारी २०१३ ते दिनांक १५ मे २०२३ याकाळात संदर्भ सेवा रुग्णालय शालीमार येथे फिर्यादीशी ओळख करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करेल’ असे सांगून वेळोवेळी विविध भेटवस्तू देऊन संदर्भ रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील बांधकाम चालू असलेल्या खोलीत अत्याचार (Torture) केल्याचा प्रकार समोर आला होता.

Nashik Accident News : समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; कार थेट पुलाखाली कोसळली, तीन जण गंभीर जखमी

यानंतर संशयिताने फिर्यादीला खोटे सांगून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashik Road Railway Station) ये आपण पळून जाऊ, असे सांगितले. मात्र संशयिताने तिथूनच बिहारला पळ काढला होता. त्यानंतर फिर्यादीने फोन केल्यावर मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगत होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यावेळी विविध कलमांसह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर भद्रकाली पोलिसांच्या पथकाने बिहार येथील गोपालगंज जिल्ह्यातील जाडोपुर येथून संशयित आरोपी असगर अली इसराफील अन्सारी (वय १९) याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवस पोलीस कोठडीत (Custody) ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Nashik News : गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून दोघांना मारहाण; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

दरम्यान, ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर सहा. पो. निरी अभिजीत सोनवणे, पोना किरण जाधव, पो. अं. विशाल गायकवाड यांच्या पथकाने केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अभिमानास्पद ! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘या’ पुरस्काराने सन्मान

- Advertisment -

ताज्या बातम्या