Thursday, April 25, 2024
Homeनगरपालकांनो सावधान... फ्री फायर गेम खेळणीही आता झाले धोक्याच !

पालकांनो सावधान… फ्री फायर गेम खेळणीही आता झाले धोक्याच !

कर्जत |वार्ताहर| Karjat

मोबाईलचा वापराचे अनेक दुष्परिणाम आता समोर येऊ लागले असून एकत्र ऑनलाइन गेम खेळण्याच्या

- Advertisement -

बहाण्याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून घेऊन जाणार्‍या मुलास कर्जत पोलिसांकडून विदर्भातील बाळापूर (जि.अकोले) येथून अटक करण्यात आली आहे. तिन दिवसानंतर पीडित मुलीची सुटका झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, 20 मार्चला कर्जतमधील एक 14 वर्षीय मुलगी अचानक घरातून गायब झाली. मुलगी घरात नसलेबाबत आई-वडिलांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेतला मिळून आली नाही. कर्जत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान गणेश ठोंबरे, तुळशीदास सातपुते असा पूर्ण वेळ स्टाफ तपासकामी नेमला.

घटनास्थळावरून अपेक्षित माहिती मिळात नव्हती. दरम्यान, काही मुलं आणि मुली ऑनलाइन फ्री फायर खेळत होती. त्यामधून पोलिसांनी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये अल्पवयीन मुलगी व हा फसवणूक करणारा मुलगा ऑनलाइन एकत्र गेम खेळत असल्याचे लक्षात आले. यानंतर गोपनीय आणि तांत्रिक माहिती वरून बाळापूर, जिल्हा-अकोला येथे पीडित मुलगी असू शकते अशी माहिती मिळाली.

तात्काळ ठिकाणसाठी पोलीस अधिकारी आणि जवान याना रवाना केले. पहाटे 3.30 वाजता दरम्यान आरोपी मिथुन पुंडलिक दामोदर, (वय 24) रा. सगद (ता. बाळापुर) याच्या घरून मुलीला आणि आरोपीस ताब्यात घेऊन कर्जत येथे आणले गेले.

फसवणुकीचा नवा फंडा

पूर्वी फेसबुक फ्रेंड सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून मुलींना किंवा महिलांना फूस लावून नेण्याच्या घटना घडत असताना आता आणखी नवीन प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे ऑनलाइन गेम जोडीदार शोधून खेळला जातो आणि यामध्ये कोणताही फोन कॉल न करता देखील फसवणूक करण्याच्या घटना घडल्याचेसमोर आल्या आहेत. यामुळे आता पालकांना आणखी सतर्क राहावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या