Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedटी २० वर्ल्ड कपवर सट्टा ; औरंगाबादमध्ये पाच सट्टेबाज जेरबंद

टी २० वर्ल्ड कपवर सट्टा ; औरंगाबादमध्ये पाच सट्टेबाज जेरबंद

औरंगाबाद – aurangabad

ऑस्ट्रेलियात (Australia) टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप (T20 Cricket World Cup) आता अंतिम टप्प्यात आहे. या वर्ल्ड कपमधील पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) अशी उपांत्य लढत नुकतीच रंगली. या सामन्यासाठी ऑनलाइन बेटिंग (Online betting) करणाऱ्या पाच जणांना सिटी चौक पोलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे. या पाच जणांकडून २ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्रीVideo गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसेVideo गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सट्ट्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना मिळाली. सदरची कारवाई त्यांच्या निर्देशावरून सिटीचौक पोलिसांनी केली. शहराचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्रोम जेन्टस पार्लर, राजाबाजार, जुना मोंढा रोड येथे बेटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कारवाईचे आदेश सहायक पोलिस निरीक्षक सय्यद मोहसीन यांना दिले. सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, पोलिस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, पोलिस उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार यांच्यासह सिटी चौक पोलीस ठाण्याचे पथकही क्रोम जेन्टस पार्लर येथे पोहोचली.

ई-बसेसच्या चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे!

याठिकाणी शोएब खान साजेदखान (वय २७, रा. नवाबपूरा), रितेश परशुरराम सदगुरे (वय ३३, रा. राजाबाजार) हे ‘वनप्लसएक्सचे ट्रस्टेड मोस्ट’ या ऍपवर युजरनेम आणि पासवर्डवरून ऑनलाईन सट्टा खेळत होते. याशिवाय संतोष भाऊलाल बसय्ये (वय ४०, रा. भानुदास नगर) यालाही ताब्यात घेण्यात आले. अभिषेक अग्रवाल (वय ३०, रा. राजाबाजार) आणि शेख मंजूर शेख मसुद (वय ४४, रा. जुना मोंढा) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या पाच जणांकडून एकूण २ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धुळयात गुंगीकारक औषध साठ्यासह एकाला अटक

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या सट्टेबाजांकडून सिटीचौक पेालिसांनी माहिती काढली असता, सदर ऍप बुकींकडून देण्यात येत होते. हा बेटिंगचा व्यवसाय नागपूर येथील सुरेश उर्फ संजू भाऊ रामनिवास जाजू (रा. घर नंबर ९०८, निकल्स मंदिर रोड, इतवारी नागपूर) व पुरब जैस्वाल (रा. औरंगाबाद ) हे चालवित असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीवरून या दोन्ही बुकींचा शोध सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या