Friday, April 26, 2024
HomeUncategorized‘बेटी बचाव बेटी पढाओ’ टास्क फोर्सच्या कृती आराखड्याची आढावा बैठक

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ टास्क फोर्सच्या कृती आराखड्याची आढावा बैठक

औरंगाबाद – Aurangabad

‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील स्त्री-पुरूष प्रमाण समान पातळीवर आणण्यासाठी मुलींच्या जन्मदरात वाढ, शिक्षण, बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी समाजमनाच्या मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ टास्क फोर्सने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टास्क फोर्स आराखड्याच्या आढावा बैठकीमध्ये अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक ग्रामीणचे सुनील लांजेवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा परिषद बाल कल्याण विभागाचे डॉ.अमरज्योती शिंदे, महानगर पालिकेचे नोडल ऑफीसर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एस.एन. केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सु.सो.शेळके, एस.जी. सावळे, महिला व बालकल्याण विभाग महानगर पालिकेच्या जयश्री दिवेकर, पोलीस उपनिरीक्षक औरंगाबाद ग्रामीण ए.एस.जावळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश राठोड गंगापूर, डी.पी.मेहेत्रे सिल्लोड, एस.एम.वाणी पैठण, आर.बी.कड फुलंब्री, आर.ए.खडसे वैजापूर तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीला ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या योजनेवर निशित कुमार यांनी प्राथमिक स्वरुपात तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये विविध योजनांचे एकत्रित सुसूत्रिकरण करुन मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी कोणकोणत्या बाबी करता येतील याविषयी माहिती दिली. ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘AAA GST’, यात अंगणवाडी सेविका, आशा, नर्स, ग्रामसेवक, तलाठी या सर्वांच्या सहभागाने बालविवाह निर्मूलनासाठी कृतीदल कशाप्रकारे सहाय्यभुत ठरेल याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित बालक विकास प्रकल्प अधिकारी यांनीही आराखड्यासाठी काही सूचना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या