Thursday, April 25, 2024
Homeनगरअमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेजला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेजला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

संगमनेर (प्रतिनिधी) –

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नियोजन व विकास विभागा तर्फे गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत देण्यात येणारा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठीचा

- Advertisement -

सर्वोत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयास शानदार कार्यक्रमात दुसर्‍यांदा मिळाला असून 3 लाख रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेला 72 व्या वर्धापन दिनानिमीत्त सर्वोत्कृष्ठ संलग्न महाविद्यालय हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे व कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.सं=स्थेच्या वतीने विश्‍वस्त सौ. शरयुताई देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी विश्‍वस्त अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. एन. एस. उमरानी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा. अशोक मिश्रा यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाने कायम गुणवत्तेबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. सन 2009-10 मध्ये सुद्धा या महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाला होता. अमृतवाहिनीतील अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक लवचिकता, टिचींग व लर्निंग प्रोसेस मध्ये माहिती-संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर, सतत नाविण्यपुर्ण उपक्रम, उत्कृष्ठ शैक्षणिक निकालाची परंपरा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प, प्रकाशने, औद्योगिक जगताशी सहयोग व कन्सल्टंन्शी प्रकल्प, सुसज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा याबरोबरच महाविद्यालयातील दरवर्षी होणारे 100% प्रवेश, आर्थिक सक्षमता, वेळोवेळी आयोजित केले जाणारे चर्चासत्रे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा, विद्यार्थी केंद्रीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, विद्यापीठातील रँक धारकांची संख्या, पी़ एच़ डी़ व पदव्युत्तर शिक्षणधारक अनुभवी शिक्षकांची मुबलक संख्या यामुळे हा पुरस्कार मिळाला.

याचबरोबर महाविद्यालयाने विशेष बाब म्हणून सौरउर्जा प्रकल्प उभारुन त्याद्वारे उर्जा आवश्यकतेत स्वयंपुर्णता सिध्द केली आहे़ नैसर्गिक गुरुत्वीय पध्दतीने कॅम्पसमधील पाणी पुरवठा केल्याने उर्जेची भरीव बचत झाली आहे़ महाविद्यालयात सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प प्रतिदिन चार लाख लिटर पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत असून त्याव्दारे पाण्याचा कॅम्पसमधील बागेसाठी पुनर्वापर केला आहे़

या गौरवाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, शरयुताई देशमुख, संस्थेचे सर्व विश्‍वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या