Monday, April 29, 2024
Homeनगरगावरान बोरे लयभारी, आठवडे बाजारात विक्रीसाठी दाखल

गावरान बोरे लयभारी, आठवडे बाजारात विक्रीसाठी दाखल

घारगाव |वार्ताहर| Ghargav

हिवाळ्याच्या सुरुवातीला रानात तसेच शेतातील बांधावर सहज उपलब्ध होणारी गावरान बोरे बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते फळ म्हणून परिचित आहे. आठवडे बाजारात विक्रीसाठी बोरे दाखल झाली असून, ग्राहकांची फळ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यानिमित्त बोरे विक्री करणार्‍या महिलांना सहज रोजगार उपलब्ध होतो. खायला चवदार आणि पाहताचक्षणी जिभेला पाणी आणणारी बोरे जीवनसत्वांचे भांडार असतात.

- Advertisement -

बोरे खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. यात असणार्‍या अँटी-ऑक्सीडेंट्समुळे लिव्हर संबंधित समस्या दूर होते, तसेच त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठीही बोरे खाणे फायदेशीर ठरते. बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असते. हे घटक रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट बनवितात. बोरे खाल्ल्याने त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. यामध्ये अँटी-ऐजिंग तत्त्व असतात आणि यामुळे त्वचा चमकदार, चिरतरुण राखण्यास मदत होते.

बद्धकोष्टची समस्या असेल, तर बोरे खाणे फायद्याचे असते. बोरे पचनक्रिया चांगली बनविण्यात मदत करतात. बोरांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. हे दात आणि हिरड्यांना मजबूत बनवण्याचे काम करते. कर्करोगाला प्रतिकार करणार्‍या पेशी वाढवण्याचे काम बोरं करतात. ऐन दिवाळीच्या सुट्टीत गावरान बोरे उपलब्ध होतात. त्यामुळे हा रानमेवा खाण्याचा आनंद वेगळाच असतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या