Wednesday, April 24, 2024
Homeजळगावबंगाली कारागिराने भंगाळे गोल्डला लावला 14 लाखाला चुना : सोने केले लंपास

बंगाली कारागिराने भंगाळे गोल्डला लावला 14 लाखाला चुना : सोने केले लंपास

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील भंगाळे गोल्डचे (Bhangale Gold) दागिने बनविण्यासाठी दिलेले 24 कॅरेटचे (24 carats) वेगवेगळ्या वजनाचे 14 लाख रुपये किमतीचे सोन्याचे तुकडे (Pieces of gold) घेऊन बंगाली कारागिर (Bengali artisans) रफुच्चकर झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अस्ता तारक रय (रा.शनीपेठ, मुळ रा.पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा( crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील भंगाळे गोल्डचे (Bhangale Gold) व्यवस्थापक आकाश भागवत भंगाळे (वय- 31, रा.ओंकार नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्ता तारक रय हा मजुरीने 2018 पासून भंगाळे गोल्डचे दागिने तयार करण्याचे काम करीत होता. वेळोवेळी त्याला दिलेल्या सोन्याच्या तुकड्याचे (Pieces of gold) तो दागिने तयार करुन देत होता. त्यामुळे त्याच्यावर पुर्ण विश्वास बसलेला होता. त्याच्याकडे दिलेल्या दागिन्यांचे ग्रॅम, मिलीग्रॅममध्ये हिशेब देखील तो ठेतव होता. त्यानुसार दिलेले सोने व त्याने तयार करुन दिलेल्या दागिन्यांच्या पावत्या देखील तयार केल्या जात होत्या. त्यावर घेणार्‍यासह देणार्‍याची स्वाक्षरी होती. अस्ता तारक रय याच्याकडे दि. 31 मार्च 2022 अखेर एकूण दिलेल्या दागिन्यांपैकी 268.25 ग्रॅम सोने येणे बाकी होते.

251 ग्रॅम सोने बाकी होते घ्यायचे

1 एप्रिल ते 1 जून 2022 या कालावधीत 24 कॅरेट सोन्याचे तुकडे स्वरुपात 636.996 ग्रॅम त्याला विश्वासाने देण्यात आले होते. त्यापैकी 653.393 सोने त्याने ऑर्डर नुसार तयार करुन जमा केले आहे. त्याशिवाय सोन्याचे तुकडे (Pieces of gold) स्वरुपात 905.246 ग्रॅम सोने देण्यात आले होते. त्यापैकी 653.391 ग्रॅम सोन्याचे दागिने जमा केले. दिलेले एकूण सोने व त्याने तयार करुन दिलेले सोने यातील फरक 24 कॅरेट 251 ग्रॅम 859 मिलीग्रॅम इतका असून हे दागिने तारक याच्याकडे घेणे बाकी होते.

चार दिवसांपूर्वी झाला पसार

गेल्या चार दिवसापासून अस्ता तारक रय हा फरार (Absconding) झाला आहे. याबाबतची माहिती मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आकाश भंगाळे यांनी शनीपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहेत.

दुरुस्तीसाठी आले दागिनेही नेले सोबत

भंगाळे गोल्डमध्ये दि. 25 एप्रिल 2022 रोजी 21 ग्रॅम 410 मिलीग्रॅम वजनाचे दागिने पुन्हा दुरुस्तीकरिता दिले होते. हेे दागिने अस्ता याने परत केले नाहीत. त्यामुळे त्याच्याकडे एकूण 273.269 ग्रॅम दागिने घेणे असून त्याची किंमत 14 लाख 11 हजार 649 इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या