Thursday, April 25, 2024
Homeनगरबेलवंडी येथील ग्रामीण साहित्य संमेलनाचा समारोप

बेलवंडी येथील ग्रामीण साहित्य संमेलनाचा समारोप

बेलवंडी |प्रतिनिधी| Belwandi

माय बापाशी आपले नाते घट्ट असले पाहिजे. भरकटलेल्या तरुनांना आयुष्यातील खरे जीवन फक्त साहित्यामुळेच समजु शकते.आज शहरी ग्रामीण असा वाद अजिबात राहीला नाही. उलट प्रत्येक क्षेत्रात आज ग्रामीण भागातील मुले पुढे जात आहेत. आजही खरे जगणे व खरे साहित्य सुध्दा ग्रामीण भागातच आहे. कितीतरी प्रतिभावंत लेखक व कवी या खेड्यापाड्यातुन पुढे गेले आजही कितीतरी नवोदित साहित्यिक खेड्यातुनच पुढे येत आहेत असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार प्राध्यापक डॉ. राजेंद्र गहाळ यांनी केले.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अखिल भारतीय साहित्य परीषद व वि. वा .शिरवाडकर युवा साहित्य परीषद शाखा बेलवंडी यांच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातुन डॉ. गहाळ बोलत होते.आज संमेलनाचा सामारोप झाला.

यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणुन जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, प्रमुख अतिथी म्हणुन निवृत्त न्यायमुर्ती वसंतराव पाटील, साहित्यिक प्राध्यापक राम कटारे, प्रकाश पाटील, सुधीर लंके, जेष्ठ साहित्यिक नारायण शिदे, प्रसिद्ध निवेदक मंगेश वाघमारे, गझल सम्राट प्रदिप निफाडकर, साहित्यिक जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बळे, बाबा आमेटे विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक अनंत झेंडे, अग्निफंख फौडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, आदीसह साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना संमेलनाध्यक्ष गहाळ म्हणाले आजच्या तरुण पिढीने महापुरुषांच्या विचारसरणीला अनसरुण जीवन जगल पाहिजे आजच्या आधुनिक साधनाचा वापर कामापुरता व गरजेपुरता केला पाहिजे त्याच्या आधीन गेल तर आपल जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.शिक्षण म्हणजे पदव्या घेण नव्हे तर समजुन घेतलेल्या ज्ञानातुन आपल वागण व जगण समृद्ध करण होय नाहीतर नुसत्या पदव्या घेऊन नोकरी करणारे अनेकजन आज भारतीय संस्कृती ला सोडुन जीवन जगत आहे आज जगात सगळ्यांत श्रेष्ठ भारतीय संस्कृती आहे त्यांचा अभिमान उराशी बाळगत आपण आपल्या संस्कार, संस्कृती ची जपणुक केली पाहिजे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी बोलताना सांगितले अशोककुमार शर्मा यांनी खडतर परिस्थितीत या ग्रामीण साहित्य संमेलन अखंडपणे चालू ठेवले आहे. ग्रामीण भागात साहित्य समाजाला समजले पाहिजे आणि त्यातून ग्रामीण भागात साहित्य जिवंत राहील.

यावेळी प्रा. डॉ. राम कटारे, प्रा. नारायण शिंदे, डॉ.अतुल चौरे, डॉ. राजेंद्र ठाकरे, वसंतराव पाटील, प्रा.डॉ. बाळासाहेब बळे यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल थोरात, शरद कुरूमकर, लक्ष्मण पाटील, समीक्षा गोसावी, प्रतीक्षा नेटवटे, साक्षी लाढाणे,विशाल म्हस्के यांनी कविता सादर करत संमेलनात रंगत आणली.

यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष काळाने, उपसरपंच उत्तम डाके, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन सुखदेव लाढाणे, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन सोपान हिरवे, समता पतसंस्थेचे चेअरमन सुनील ढवळे, ऋषिकेश शेलार, ग्रा. पं. सदस्य संदीप तरटे, शरद इथापे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जठार, अनंत झेंडे, अनंता पवार, नारायण निंबाळकर, कैलास राऊत, गणेश लाढणे, प्रा. सुजाता डाके, प्रा. युवराज शेलार, साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक संयोजक अशोककुमार शर्मा यांनी केले तर सुत्रसंचालन प्राध्यापक केशव कातोरे यांनी केले तर आभार गणेश लाढाणे यांनी मानले.

यांचा झाला गौरव

या ग्रामीण साहित्य संमेलनात आदर्श लोकनेता म्हणुन उपसरपंच उत्तम डाके , आदर्श शिक्षक म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे,प्रा. डॉ. अतुल चौरे, समाजभूषण डॉ. विजय मैड, उत्तम वैद्यकीय सेवा डाँक्टर वैशाली लगड , उद्योजक चेतन शर्मा, आदर्श आरोग्यसेविका मंगल साबळे यांना पुरस्कार देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या