Thursday, May 9, 2024
Homeनगरपिण्याच्या पाण्यासाठीची वणवण यंदा थांबली

पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण यंदा थांबली

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव ग्रामस्थांची प्रथमच पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्यात होणारी वणवण योग्य प्रकारे झालेल्या नियोजनामुळे थांबली आहे.

- Advertisement -

सरपंच निकिता गटकळ व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून योग्य प्रकारे नियोजन केल. प्रत्येक वाडी वस्ती तसेच गावात देखील पिण्याचे,तसेंच वापरायचे पाणी याचे योग्य प्रकारे नियोजन केले व आज गावात उन्हाळ्यात फिरणारे हंडे, ड्रम प्रथमच बंद झाले आणि गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची वणवण भर उन्हाळयात बंद झाली.

ग्रामपंचायत मार्फत गावात दोन ठिकाणी आरओच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तसेच गावातील सर्व नळाला योग्य पाणी येते व पंधरा दिवस झाले की पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून पाणी नियोजन केले जाते त्यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायत सरपंच तसेच सर्व सद्स्य यांचे आभार व्यक्त केले

उन्हाळ्यात घरात फक्त एकच काम महत्वाचं असायचं. ते म्हणजे कुठेही जा पण पिण्याचं पाणी घेऊन या. दोन-दोन हंड्यांकरीता मी दिवसभर गावात वणवण भटकंती करायची पण यावर्षी सरपंच महिला असल्याने त्यांनी आमची वणवण लक्षात घेऊन आम्हाला पाण्याची योग्य प्रकारे सोय केली

– गयाबाई विनायक साठे गृहिणी, बेलपिंपळगाव

अनेक वर्षापासून बेलपिंपळगाव मधील महिलांची पिण्याच्या पाण्याची वणवण मनाला चटका लावून जात होती. मी सरपंच झाल्यावर ही वणवण बंद करून गावातील उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी भटकंती बंद झाली याचा अभिमान वाटतो.

– निकीता चंद्रशेखर गटकळ सरपंच

- Advertisment -

ताज्या बातम्या