Friday, April 26, 2024
Homeजळगावमंदिर उघड्यासाठी चाळीसगाव येथे घंटानाद आदोलन

मंदिर उघड्यासाठी चाळीसगाव येथे घंटानाद आदोलन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

करोना पार्श्‍वभूमीवर बंद करण्यात आलेली मंदिर उघडण्यासाठी आज शहरातील दत्त मंदिर परिसरात तालुक्यातील गणपुर (बेलदारवाडी) नर्मदा गो शाळा संस्थानतर्फे घंटानाद आदोलन करण्यात आले, या आदोलनात…

- Advertisement -

चाळीसगाव भारतीय जनता पक्षाने सक्रिय सहभाग नोंदवला. याप्रसंगी श्री गणेश आरती, श्रीदत्त आरती व अभंग पठण करण्यात आले. सिध्देश्वर आश्रमचे सचिव ह.भ.प.श्री. सुधाकर महाराज यांनी मनोगतात सांगितले की मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावी. वारकरी बांधवांनी नेहमीच शासनाच्या आदेशाचे पालन केले आहे. भक्तीमध्ये प्रचंड शक्ती असून कोरोनाला हरवता येईल.

याप्रसंगी जेष्ठ भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल निकम, मा.शहराध्यक्ष राजुआण्णा चौधरी, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, आध्यात्मिक आघाडी समन्वयक भुषण पाटील, तालुका चीटणीस अभिषेक मोरे, युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष आदित्य महाजन, सरचिटणीस दिनेश महाजन, प्रसिद्धी प्रमुख प्रविण मराठे, व्यापारी आघाडी तालुका उपाध्यक्ष किशोर रणधीर, माजी विस्तारक विकी देशमुख, सरचिटणीस गौरव चौधरी, संदीप राणा, गणेश सैंदाणे, संजय तांबे, कैलास गायकवाड, भाऊसाहेब पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या