सातपुर | Satpur
सातपूर परिसरातील विविध देवस्थानाच्या बाहेर नागरीकांनी घंटानाद करुन मंदीर उघडण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सातपूर परिसरातील विविध देवस्थानाबाहेर घंटानाद करुन नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सातपूर कॉलनीतील सप्तश्रृंगी मंदीर परिसरात रामहरी संभेराव, गौरव बोडके, प्रकाश महाजन,भगवान काकड यांनी घंटानाद केला.
सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमानमंदिर, साईबाबा मंदिर परिसरात घंटानाद करण्यात आला.
तसेच श्रमिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिर, महादेव मंदिर प्रांगणात घंटानाद करण्यातआला. बालाजी मंदीर, नवश्या गणपती मंदिर, कामगार नगरातील गणेश मंदिरात नागरीकांनी घंटानाद केले.