Monday, April 29, 2024
Homeनगरबेल्हे बाजारात शर्यतींच्या बैलांच्या किमतीही लाखाच्या घरात

बेल्हे बाजारात शर्यतींच्या बैलांच्या किमतीही लाखाच्या घरात

घारगाव |वार्ताहर| Ghargav

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवून शर्यतीला परवानगी दिली त्यामुळे पुन्हा एकदा खिलार जातीच्या बैलांना महत्व प्राप्त झाले आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील बेल्हा (जुन्नर) बैलबाजारात घाटात पळणार्‍या बैलांच्या खरेदी विक्री करणार्‍याची मोठी गर्दी झाली होती. करोना काळात बैलांना 20 ते 30 हजार रुपये देण्यास कोण तयारही नव्हते मात्र आता त्याच बैलांच्या किमतीती 20 ते 30 टक्के वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले.

- Advertisement -

करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाने राज्यात जे लॉकडाउन करण्यात आले याचा परिणाम शेतीवर कमी पण जनावरांच्या खरेदी-विक्री वर झाला. आठवडे बाजार बंद पडल्याने जनावरांच्या किमती पूर्णपणे ढासळल्या गेल्या.

मागील आठवड्यात शर्यतीवरील बंदी उठली त्यामुळे बैलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली तसेच किमती तर लाखो रुपयांमध्ये जाऊन पोहचल्या. सध्या शर्यतीचे शौकीन किमतीचा कोणताही विचार न करता खिलार जोड आहे का हेच विचारत आहे. अजून शर्यतीचे आयोजन सुद्धा करण्यात आले नाही तोच खरेदी-विक्री सुरू झाली आहे. शर्यतीला सुरूवात झाली की खिलार जातीच्या बैलांच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढल्या जाणार आहेत. लवकरच यात्रा जत्रांचा हंगाम सुरू होणार आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने मागील 7 वर्षांपासून बंद असलेली बैलगाडा शर्यतबंदी सुद्धा उठवली आहे.

दरम्यान बेल्हे बैलबाजारात सोमवारी घाटात पळणार्‍या बैलांच्या खरेदी विक्री करणार्‍याची मोठी गर्दी झाली होती. शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या निर्णयानंतर बैलगाडा घाटात आपली चपळाई दाखवणार्‍या खिलार बैलाच्या किमती तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या होत्या. वाढीव रक्कम देऊन खिलार बैल खरेदी करण्याची तयारी शौकिनांबरोबर शेतकर्‍यांनीही दाखवली. पुढील आठवड्यात बहुतांशी जनावरांच्या बाजारांमध्ये खिलार जातीचे बैल विक्रमी भावात विकले जातील अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या