Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रबेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला!

बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला!

बेळगाव (Belgoan)

कर्नाटकासह (Karnataka) संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Belgaum Mahanagarpalika Election Result) भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाने ३६ जागा मिळवत बहुतमतात असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता.

- Advertisement -

५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी (Belgaum Mahanagarpalika Election) ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी (Sanjay Raut) बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे.

बेळगाव निवडणुकांमध्ये भाजप बहुमतांनी निवडून आलं आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीत निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, असे नोलन पिंटो यांनी म्हटले आहे. भाजपाला ३६ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ९ आणि इतरांना बेळगावी नगरपालिकेच्या एकूण ५८ जागांपैकी १३ जागा मिळाल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली होती, मात्र ते त्यात यशस्वी ठरले नाहीत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात भाजप ५५, काँग्रेस ४५, महाराष्ट्र एकीकरण समिती २१, जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष २१७ उमेदवारांचा समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या