Friday, April 26, 2024
Homeनगरबेलापूरला सत्तांतर; गावकरी मंडळाला 11 तर जनता विकास आघाडीला 6 जागा

बेलापूरला सत्तांतर; गावकरी मंडळाला 11 तर जनता विकास आघाडीला 6 जागा

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता विकास आघाडीला सत्तेतून पायउतार करीत गावकरी मंडळाने 11 जागा जिंकुन सत्ता मिळविली.

- Advertisement -

तर प्रदिर्घ काळ सत्तेत असलेल्या जनता विकास आघाडीला 6 जागांवर समाधान मानावे लागले.

जि. प. अध्यक्ष शरद नवले, अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे, भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे व सुनील मुथा यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे 11 आणि पं स. सदस्य अरुण पा. नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड, माजी सरपंच भरत साळुंके यांच्या नेतृत्वाखालील 6 उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रभाग निहाय उमेदवार व त्यांना मिळालेली मते – प्रभाग-1 रविंद्र मुरलीधर खटोड विजयी जविआ (741), संजय बापूराव गोरे-पराभूत गामं (561), राजेंद्र राशीनकर-पराभूत-स्वतंत्र (33), सौ. रंजना किशोर बोरुडे- विजयी जविआ (671), सौ. माधुरी प्रशांत ढवळे पराभूत- गामं (650), सौ. तबसुम असिफ बागवान विजयी गामं (630), सौ. शिरीन जावेद शेख-पराभूत जविआ (585), सौ.सय्यद बेगम आबुताहेर-पराभूत-स्वतंत्र (90)

प्रभाग-2 भरत अशोकराव साळुंके विजयी जविआ (586), प्रफुल्ल हरिहर डावरे-पराभुत गामं (554), कैलास मदनलाल चायल -पराभूत स्वतंत्र (541), कु. सविता उत्तमराव अमोलिक विजयी गामं(818), सौ. छाया विलास सोनवणे-पराभुत जविआ (757), सौ. नंदा अनिल पवार -पराभूत स्वतंत्र(86), सौ. शिला राम पोळ विजयी जविआ (936), सौ. सोनाली हेमंत बनभेरू पराभुत-गामं (728).

प्रभाग-3 अभिषेक भास्करराव खंडागळे विजयी गामं ( 1018 ), चंद्रकांत गुलाबराव नाईक-पराभुत जविआ (578), नवाज इलियास शेख-पराभूत स्वतंत्र (456), सौ. प्रियंका प्रभात कु-हे- विजयी गामं (1145), सौ.गौरी चेतन कुर्‍हे पराभूत जविआ (870 )

प्रभाग-4 मुश्ताक उमर शेख- विजयी गामं (910), हरुन महेमुद सय्यद पराभुत -जविआ (696), सौ. छाया बाळासाहेब निंबाळकर विजयी जविआ (816), सौ. कल्याणी रमेश लगे पराभूत गामं (794), सौ. सुनीता राजेंद्र बर्डे विजयी जविआ (852), सौ. कमल भगवान मोरे पराभुत गामं( 748)

प्रभाग-5 महेंद्र जगन्नाथ साळवी विजयी गामं (722), विशाल डॅनियल साळवे पराभुत जविआ (506), अच्छेलाल यादव पराभूत -स्वतंत्र (107), सुविध भोसले पराभुत स्वतंत्र (17), वैभव विलास कुर्‍हे विजयी गामं (708), विजय लहू कुर्‍हे पराभूत जविआ (673), सौ. मिना अरविंद साळवी विजयी गामं (659), सौ. राणी मिलिंद एडके -पराभुत जविआ (607),कविता झिने पराभूत स्वतंत्र (93).

प्रभाग-6 चंद्रकांत मोहनराव नवले विजयी गामं (997), सुधीर वेणूनाथ नवले पराभूत जविआ (850), राजेंद्र मोहन राशीनकर पराभुत स्वतंत्र (54), अच्छेलाल यादव पराभुत स्वतंत्र (63), निलेश प्रकाश पाटणी पराभुत स्वतंत्र (63), रमेश कमलाकर अमोलिक विजयी गामं (1050), भाऊसाहेब वसंत तेलोरे पराभुत जविआ (932), सौ. उज्वला रविंद्र कुताळ विजयी गामं (1096), सौ.सिमा विवेक वाबळे पराभुत जविआ (877) याप्रमाणे मते मिळाली आहेत.

या निवडणुकीत अरुण पा. नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांचा अभिषेक खंडागळे यांनी 440 इतक्या मोठ्या मताधिक्याने तर सुधीर नवले यांचा शरद नवले यांचे बंधु चंद्रकांत नवले यांनी 145 इतक्या मोठ्या फरकाने धक्कादायक पराभव केला.

तर प्रभाग दोन मध्ये माजी सरपंच व भाजपचे माजी शहराध्यक्ष भरत साळुंके यांनी लक्षवेधी तिरंगी लढतीत तिसर्‍यांदा बाजी मारली. त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे तसेच स्वतंत्र उमेदवार कैलास चायल यांचा पराभव केला. रविंद्र खटोड यांनी नवखे उमेदवार संजय बापूराव गोरे यांचा 180 मतांच्या फरकाने पराभव करून तिसर्‍यांदा बाजी मारली.

जनता आघाडीच्या सौ. छाया विलास सोनवणे या सविता अमोलिक यांच्याकडून पराभूत झाल्या.येथे जनता आघाडीच्या वेळेत अर्ज माघारी घेऊ न शकलेल्या व नंतर जनता आघाडीला पाठिंबा दिलेल्या माजी उपसरपंच सौ. नंदा अनिल पवार यांना 86 मते मिळाली. त्यांची तांत्रिक उमेदवारी राहिल्याचा फटका आघाडीच्या सौ. सोनवणे यांना बसला. प्रभाग 1 आणि प्रभाग 5 मध्ये स्वतंत्र उमेदवाराचा पराभुत उमेदवारांना चांगलाच फटका बसला.

प्रभाग 5 मध्ये स्वतंत्र उमेदवार कविता झिने यांचा फटका त्यांच्या भाचीला बसला. प्रभाग 5 मध्ये गावकरी मंडळाचे महेंद्र साळवी आणि सौ. मिना साळवी हे दिर भावजयी विजयी झाले आहेत. माजी उपसरपंच रविंद्र खटोड व भरत साळुंके प्रतिक्रिया देताना म्हणाले की, कर्मयोगी मुरलीधर खटोड यांचा समर्थ वारसा पुढे चालविताना गावाच्या विकासाला बांधील राहुन काम करु. सक्षम सकारात्मक विरोधकांची भूमिका बजावताना सत्ताधार्‍यांना चांगल्या कामात साथ देऊ. तर सुधीर नवले म्हणाले, जनतेने दिलेला कौल मान्य आहे. हा जनतेची दिशाभूल, दहशत, दादागिरी व धनशक्तीचा विजय आहे.

जि. सदस्य शरद नवले यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले, निवडणूक संपली मतभेद संपले. आता गावाच्या विकास कामांना प्राधान्य देणार आहोत. पिण्याच्या पाण्याची योजना, घनकचरा आदीकामे प्राधान्याने करणार आहोत. विजय सुज्ञ मतदारांना समर्पित करीत आहोत.

निकाल कळताच गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा करीत मिरवणूक काढली.एका छोटेखानी विजयी सभेत शरद नवले, सुनील मुथा, यांनी मतदारांचे आभार मानले.

तर जनता विकास आघाडीचे अरूण पा. नाईक, सुधीर नवले, रविंद्र खटोड व भरत साळुंके यांनी विजयी उमेदवारांचे कौतूक करुन मतदारांचे छोटेखानी सभेत आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या