Friday, April 26, 2024
Homeनगरगोमांसाची वाहतूक करणार्‍या पिकअपची ट्रकला धडक

गोमांसाची वाहतूक करणार्‍या पिकअपची ट्रकला धडक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या पिकअपने ट्रकला धडक दिल्याची घटना

- Advertisement -

तालुक्यातील डोळासणे शिवारातील बांबळेवाडी परिसरात काल दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

नाशिक-पुणे महामार्गाने बांबळेवाडी परिसरातून एम. एच. 47 ई 2760 या क्रमांकाची पिकअप भरधाव वेगाने जात होती. दरम्यान या पिकअपने दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एम. एच. 12 एन. एक्स. 6673 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घारगाव पोलिसांनी पंचनामा करून पिकअपमधील 750 किलो गोमांंस जप्त केले.

याबाबत बबन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पिकअपच्या चालकाविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 54/2021 नुसार भारतीय दंड संहिता 429, 427, 269, 279, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1955 चे कलम 5 (अ), 9 (क) प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल ए. आर. गांधले हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या