Thursday, April 25, 2024
Homeनगरबीडच्या बॅण्ड पथकाच्या वाहनास कर्जतजवळ अपघात

बीडच्या बॅण्ड पथकाच्या वाहनास कर्जतजवळ अपघात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

बीड येथील जनता बँड पथकाच्या वाहनाला कर्जत जवळील बहिरोबावाडी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बँड पथकातील दहाजण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

जालिंदर जावळे, राजू आडागळे, दीपक शेलार ,नितीन साठे, समीर सय्यद, तात्या साठे, विजय गायकवाड, सैद सय्यद ,असलम सय्यद , करीम सय्यद अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. इतरही काहीजण जखमी असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील जनता बँड पथक हे सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर येथे कार्यक्रमासाठी गेले होते. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कर्जत नगर रोडवर बहिरोबावाडी शिवारामध्ये पाटोदा या त्यांच्या गावी जात असताना त्यांची गाडी आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 23, 2377 ) यास अपघात झाला.

अपघातामध्ये टेम्पो पलटी होऊन रस्त्याच्या खाली गेला.हा अपघात घडल्यानंतर बहिरोबावाडी येथील आकाश लाळगे, ज्ञानदेव लष्कर, सुरेश तोरडमल, राजेंद्र जाधव, राजेंद्र लाळगे, या युवकांनी तसेच इतर ग्रामस्थ घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. तात्काळ त्यांनी रुग्णवाहिका बोलावली आणि सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय कर्जत याठिकाणी उपचारासाठी घेऊन गेले. सर्व जखमींवर येथे उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या