Thursday, April 25, 2024
Homeजळगावलग्न समारंभात मधमाश्यांचा हल्ला

लग्न समारंभात मधमाश्यांचा हल्ला

वरणगाव फॅक्टरी, Varangaon Factory, ता.भुसावळ । वार्ताहर

तालुक्यातील तळवेल येथील बाळकृष्ण पुरुषोत्तम पाटील यांच्या मुलाचा विवाह दि.17 मार्च रोजी वरणगाव येथील नागेश्वर मंदिर, सप्तशृंगी माता मंदिर हॉल येथे होते. लग्न समारंभ (wedding ceremony) सुरू असतांना हॉलमध्ये असलेल्या लाल मधमाशांनी (Hany Bee) लग्नातील पाहुणे मंडळीवर हल्ला (attack) केल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत वृत्त असे कि, तालुक्यातील तळवेल येथील वर व यावल तालुक्यातील हिंगोणा येथील वधू यांचा विवाह सोहळा वरणगाव जवळील सप्तशृंगी माता हॉलमध्ये ठेवण्यात आला होता. लग्न लागल्यावर जेवणाच्या वेळेस अचानक हॉलमध्ये असलेल्या लाल मधमाशांनी वर्‍हाडी मंडळीवर हल्ला चढवला.

यावेळेस वर्‍हाडी मंडळी जेवण सोडून सैरावैरा पळत सुटले, तरी सुद्धा मधमाशांनी या घटनेत जवळपास पंधरा ते वीस जणांना जास्त प्रमाणात चावा घेतला आहे. यात सौ.प्रमिला बाळकृष्ण झांबरे ओझरखेडा, सुभाष पुरुषोत्तम पाटील भुसावळ, सुमित राजेंद्र बढे, पाली फोटोग्राफर, आकाश गजानन पाटील चांगदेव, योगेश पाटील कासारखेडा, भोजराज पाटील बेटावद यांना जास्त प्रमाणात माश्यांनी चावा घेतलेले आहे. या व्यक्तीवर वरणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी तळवेल येथील संजय नारायण कापसे यांच्या मुलाच्या विवाहाप्रसंगी सुद्धा याच ठिकाणी अशी घटना घडलेली होती. तरीसुद्धा संस्था चालकांनी कुठलीही दक्षता न घेतांना कार्यक्रम बुक करून हॉल भाड्याने देणे सुरूच ठेवले. वास्तविक पाहता ठिकाणी अग्निशमन दलाचे प्रशिक्षण केंद्र असून या केंद्रामार्फत मधमाशांना बंदोबस्त करण्याचे काम होऊ शकते. परंतु संस्थेने यावर कोणताही उपाय केला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या