Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात कोविड रुग्णांसाठी आणखी इतक्या खाटा शिल्लक

नाशकात कोविड रुग्णांसाठी आणखी इतक्या खाटा शिल्लक

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना ससंर्गाचा वेग वाढता असुन दररोज हजार नवीन रुग्णांची भर पडत असल्याने पुढच्या आक्टोंबर महिन्यात गंभीर स्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे…

- Advertisement -

शहरातील रुग्णांचा आकडा 40 हजाराच्या जवळ पोहचला आहे. मृतांचा आकडा सहाशेच्यावर गेला आहे. वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत मनपा प्रशासनाकडुन आता कोविड रुग्णांसाठी शहरातील सर्वच हॉस्पिटलचा वापर करीत आणि महापालिकेच्या रुग्णालयातील खाटा वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

आजमितीस शहरात 74 रुग्णालयात महापालिकेकडुन 3 हजार 914 खाटा आरक्षित असुन यापैकी 1304 खाटा शिल्लक आहे.

शहरात सप्टेंबर महिन्यात पहिल्या दिवसांपासुन प्रति दिन 900 ते 1000 अशा नवीन रुग्णांची भर पडत आहे. 12 सप्टेंबर पर्यत शहरातील एकुण रुग्णांची संख्या 35 हजारावर गेल्यामुळे आणि रुग्ण दुप्पट होण्याचा दर 24 दिवसावर आला असल्याने आता पुढच्या काळात करोना संसर्ग शहरात गंभीर रुप धारण करण्याची भिती आता व्यक्त होत आहे.

बाधीत रुग्णांच्या संंपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडुन पुरेशी काळजी घेतली जात नाही. तसेच मास्क न वापरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच काही जण करोना संशयित चाचणी न करताच फिरत आहे. परिणामी करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याचा मोठा ताण आता महापालिका प्रशासनावर पडत आहे.

महापालिका प्रशासनाकडुन कोविड केअर सेंटर मध्ये 1765, कोविड हेल्थ सेंटर 1474 व कोविड रुग्णालयात 510 अशा एकुण खाटा रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहे. तसेच शहरात खाजगी 578 नॉन कोविड रुग्णालयात 6618 खाटा असुन अशाप्रकारे एकुण 10 हजार 367 खाटा तयार आहे.

शिवाय शहरात 571 आयसीयु खाटा व 270 व्हेंटीलेटर खाटा कार्यरत आहे. आजमितीस शहरात 1032 ऑक्सिजन खाटांपैकी 259 खाटा शिल्लक आहे. तसेच 371 आयसीयु खाटांपैकी 45 व 136 व्हेंटीलेटर खाटांपैकी 16 आणि 2325 सर्वसाधारण खाटांपैकी 983 खाटा शिल्लक आहे. अशाप्रकारे महापालिकेकडुन दरररोज आपल्या संकेतस्थळावर शहरातील सरकारी व खाजगी रुग्णालयातील खाटांची स्थितीसंदर्भातील माहिती अद्यावत स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहे.

अशी वाढविणार खाटांची संख्या

नवीन बिटको रुग्णालयात अतिरीक्त 500 खाटा वाढविणार असुन यात 200 खाटा या ऑक्सिजनच्या असणार आहे.

मविप्र मेडीकल रुग्णालयात अतिरीक्त 60 ऑक्सिजन खाटा तयार केल्या जाणार आहे.

शहरातील नवीन रुग्णालयांना परवानगी देऊन त्यांच्यामार्फत 700 ते 800 खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. अशाप्रकारे सध्या असलेल्या 3749 खाटांत लवकरच नवीन 2250 इतक्या खाटा वाढविण्याचे नियोजन केले जात आहे.

शहरातील 74 रुग्णालयातील कोविड रुग्ण खाटां स्थिती

मनपा आरक्षित खाटा वापरात खाटा शिल्लक खाटा

3914 2610 1304

ऑक्सीजन 1032 773 259

आयसीयु 347 329 45

व्हेंटीलेटर 136 120 16

जनरल 2325 1342 983

मनपा व खाजगी रुग्णालय साधारण खाटांची स्थिती

रुग्णालय खाटा क्षमता वापरातील खाटा शिल्लक खाटा

समाज कल्याण 500 193 307

बिटको 400 390 10

नवीन बिटको 190 000 190

मेरी वसतीगृह 200 76 124

ठक्कर डोम 285 164 121

ज्युपिटर 100 45 55

- Advertisment -

ताज्या बातम्या