देशभक्तीची रिल्स बनवून व्हा सुपरस्टार!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पारंपारिक माध्यमातून जनजागृती करण्याबरोबरच आधुनिक युगातील रिल्सचा वापर करुन प्रभावी जनजागृती झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दृश्य स्वरुपात दिसू शकेल, या भावनेने स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना नाशिकच्या वतीने देशभक्ती तसेच मराठी अस्मितेचा जागर व्हावा, शहरवासीयांचे ज्ञात-अज्ञात पैलू लोकांसमोर यावेत, या उद्देशाने शिवसेना नाशिकच्यावतीने ‘रील्स सुपरस्टार’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात दडलेल्या कला गुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने रील्स सुपरस्टार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी याबाबतची घोषणा केली. त्यावेळी संपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, आय टी सेल जिल्हाप्रमुख नितीन देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. त्यात प्रामुख्यानेप्रथम पारितोषिक (सॅमसंग मोबाईल-2 नग), व्दितीय पारितोषिक (नोईज कान्सालिंग इअरबड्स-4 नग), 3) तृतीय पारितोषिक (स्मार्ट वॉच- 6 नग)

स्पर्धकांनी आपले रील्स व्हिडिओ शनिवार (दि.12) संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत पाठवावे. त्यानंतर येणार्‍या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. नाशिक शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते अपलोड करण्यात येतील. स्पर्धेचा निकाल तसेच पारितोषिक वितरण 15 ऑगस्ट रोजी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या विषयांचा समावेश

– 1)हम हिंदुस्थानी :- देश भक्तीपर रिल्स, 2) जय जय महाराष्ट्र माझा :- मराठी अस्मिता, मराठी परंपरा, मराठमोळी वेशभूषा, मराठी खाद्य संस्कृती दाखवणारे रील्स, 3) कलर्स ऑफ नाशिक :- नाशिक पर्यटन, निसर्ग सौंदर्य, धार्मिक स्थळे, संस्कृती वैभव, स्वच्छ नाशिक संकल्पना इत्यादींवर आधारित रील्स, 4) आई पण भारी देवा :- मुलांनी आई सोबत किंवा आईने मुलांसोबत तसेच परिवारासोबत बनवलेले रील्स, 5) असा मी-आसामी :- सोलो डान्स, सिंगींग, वक्तृत्व इतर कलाविष्कार


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *