Saturday, April 27, 2024
Homeजळगावरस्त्यावरील अपघाताला देवदूत ठरल्या डॉ. योगिता पाटील

रस्त्यावरील अपघाताला देवदूत ठरल्या डॉ. योगिता पाटील

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माऊली हॉस्पिटलच्या (Mauli Hospital) डॉ.योगिता पाटील (Dr. Yogita Patil) यांनी रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वारावर उपचार करून जीव वाचवल्याने, त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

सोमवारी सायंकाळी डॉ.योगिता पाटील (Dr. Yogita Patil) व त्यांचे पती डॉ.संदीप पाटील रावेरवरून बऱ्हाणपूर येथे संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास जात असताना, खानापूर उड्डाण पुलाजवळ एक जण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली गाडी थांबवून गाडीत ठेवलेले इमर्जन्सी बॉक्स काढून डॉ. योगिता पाटील यांनी तत्परतेने इमर्जन्सी इंजेक्शन दिले व सलाईन लावले.

- Advertisement -

बेशुद्ध अवस्थेत असलेले तुळशिराम सुभाष सावळे (रा. कर्जोद) यास औषधे देऊन शुद्धीवर आणले. यावेळी मोठा अंधार होता,मात्र जमलेल्या ग्रामस्थांनी मोबाईलमधील टॉर्च लावून उजेड केल्याने, डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न यशस्वी झाले.

डॉ. योगिता पाटील (Dr. Yogita Patil) उपचार करत होत्या, तर डॉ संदीप पाटील हे त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी नेण्यासाठी अंबुलन्स व पोलीस व डॉक्टरांशी बोलून रुग्णांना वाचवण्यासाठी धडपड करत होते. यावेळी खानापूर येथील भास्कर पाटील व गावकऱ्यांनी या कामात सहकार्य केले.

एकंदरीतच परिसरातील सर्व मंडळींनी डॉ.योगिता व डॉ. संदीप पाटील यांचे कौतुक करून आभार मानले, असा कित्ता सर्व डॉक्टरांनी गिरवावा व आपापल्या गाडीमध्ये किमान औषधी चे इमर्जन्सी कीट असावे असे परिसरातील लोकांनी डॉक्टरांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या