Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदेवळालीच्या मैदानाचे खुलले सौंदर्य

देवळालीच्या मैदानाचे खुलले सौंदर्य

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

जुने,अडगळीत पडलेले साहित्य याची जुळवाजुळव करून कॅन्टोमेन्टच्या आनंदरोडवरील मैदानात सुंदर देखावा उभारून व्यायामप्रेमीसह ज्येष्ठ नागरिकांना यांना आनंद देण्याचा प्रयन्त करतानाच आरोग्य निरीक्षक अमन गुप्ता यानी टाकाऊतून टिकावू ही संकल्पना साकारली आहे.

- Advertisement -

आरोग्यासाठी लाभदायी वातावरण अशी देशभर ओळख असलेल्या देवळाली कॅन्टोमेन्टने आरोग्यासाठी सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत.येथील आनंदरोड मैदानावरील ब्रिटिश कालीन प्राथमिक शाळा हटविण्यात येऊन ती गुरुद्वारा रोडवर स्थलांतरित करण्यात आली. संपूर्ण आंनदरोड मैदानावर सपाटीकरण करून खासदार हेंमंत गोडसे यांच्या माध्यमातून 50 लाख रुपये खर्चाची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली.

सोबत 75 लाख रुपये खर्चाचा जॉगिंग ट्रक तयार करण्यात येऊन ग्रीन जीम बसविण्यात आली. त्याचा लाभ हजारो नागरिक घेत आहेत.याच मैदानावर कॅन्टोमेन्टचे आरोग्य निरीक्षक अमन गुप्ता यांनी स्टोर विभागात पडलेले जुने टायर,निकामी रॉड याची दुरुस्ती करून त्याद्वारे आकर्षक असा देखावा तयार केला. मैदानावर येणा़र्‍या आबाल वृद्धाचे ते आकर्षण ठरत आहे.

जुने अडगळीत पडलेले साहित्य त्याची व्यवस्थित साफसफाई करून ते वापरात आणले. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करण्यात आला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार,संजय सोनवणे,राजेन्द्र ठाकूर या वरिष्ठांंच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊपासून टिकाऊ असे साहित्य बनवले आहे.नागरिकांंनी बोर्डास सहकार्य करावे.

अमन गुप्ता,आरोग्य निरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या