Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमनोरम्य निसर्गस्थळ साखळचोंड

मनोरम्य निसर्गस्थळ साखळचोंड

वांगणसुळे । Surgana – दौलत सुळे

महाराष्ट्र – गुजरातच्या (Maharashtra – Gujarat) सरहद्दीवर नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुरगाणा (Surgana) परिसरात पिंपळसोंड या गावानजीक पिंपळसोंड-अंबाठा रस्त्यालगत (Pimpalsond-Ambatha road) निसर्गरम्य घनदाट वनराईच्या कवेत वसलेलं, डोंगर-दरींच्या कुशीत दडलेलं, पाहून डोळ्यांचे पारणे फिटावे असे नयनरम्य निसर्गस्थळ म्हणजे साखळचौंड धबधबा होय. घनदाट वृक्षांच्या गर्द खाडीत खळखळणा-या पाण्याचा इतका सुंदर नजारा (Beautiful view) की, ’नुसतं पाहवं आणि पाहतच राहावं’.

- Advertisement -

मानवी मनाला भुरळ पडावी अशी निसर्गाने केलेली सौंदर्याची भरभरून उधळण. इवल्याशा दोन डोळ्यांनी नेमके काय-काय टिपावं अन् काय नाही असा यक्षप्रश्न निसर्गप्रेमींना पडतो. निसर्गदेवतेने खुल्या दिलाने व सढळ मोकळ्या हाताने सौंदर्याची भरभरून उधळण केल्याची प्रचितीच येथे येते. निसर्गाच्या अलौकीक किमयेची अनुभूती (Experience the supernatural alchemy of nature) घ्यावी ती अशा नैसर्गिक सौंदर्यस्थळातूनच.

नयनरम्य साखळचौंड धबधबा (Sakhalchound waterfall) म्हणजे पिंपळसोंड उंबरपाडा गाव शिवारात गावापासून दोन किमी अंतरावर अंबाठा रस्त्यालगत पण निसर्गसंपन्न घनदाट वनराई आणि डोंगराच्या कुशीत दडून बसलेलं मनोरम्य निसर्गस्थळ होय. मुख्य रस्त्याने जाणार्‍या कुणा प्रवाशाच्या सहज नजरेला पडत नाही आणि सहज नजरेला पडावं एवढे साधारणही ते नाही. खरेतर ती सौंदर्याची अप्रतिम खाणच आहे. त्यासाठी प्रवासी म्हणून नाही तर खास पर्यटक (Tourists) म्हणूनच जाणे आवश्यक आहे.

गर्द झाडीतून तीव्र खोल दरी उतरून खाली गेल्यानंतर नजरेला पडतो तो अनुपम असा ’साखळचौंड धबधबा’. मन अगदी आल्हादून जावं असं दुतर्फा नयनरम्य निसर्ग, खळखळून उसळत वाहणारं निखळ पाणी, अंगावर पडणा-या पाण्याचे नैसर्गिक तुषार मग कुणी पाण्यात मनसोक्त पोहतं, कुणी धबधब्यांखाली थांबून चिंब भिजत तर कुणी दगडावर बसून निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवण्याच्या नादात हरवून जातं, तर काही मोबाईल कॅमे-यात कैद करतात. ’आनंदे पाहावे याच डोही याचं जगी’. याची खरीखुरी अनुभूतीच येथे येते.

पण यासाठी आपल्या जवळ असावी लागते ते निखळ सौंदर्यदृष्टी, निसर्गप्रेम (Love of nature) आणि पर्यावरणनिष्ठाच. या स्थळाचे ’साखळचौंड’ असे का बरे नामकरण झाले असेल? याचे कारण असे की,धबधब्यांची येथे शृंखलाच अर्थात येणारे पाणी हे तीन-चार मोठ्ठे टप्पे घेऊन कोसळते. धबधब्यांची सलग शृंखला – साखळी येथे पहावयास मिळते, म्हणून साखळचौंड धबधबा म्हणून संबोधले जाते. पण निसर्गाच्या या वैभवसंपन्न स्थळाची म्हनावी तशी फारशी लौकिकता नाही.

परिसरातीलही फारशा लोकांना याची जाण नाही. बहुतेक जणांना तर त्याचा मागमूसही नाही. पंचक्रोशीतील समाज, पर्यटक व शासनाने या सौंदर्यपूर्ण स्थळाची परवड केली, पर्यटन विभागाने (Department of Tourism) साधी दखलही घेतली नाही ही फार मोठी चिंतेची व खेदाची बाब आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) व पर्यटन विकास मंत्रालयाने (Ministry of Tourism Development) साखळचौंड धबधबा सारख्या अनेक स्थळांचा जे अगोदरच निसर्गतः सौंदर्यस्थळं आहेत अशा निसर्गस्थळाचा शोध घेऊन, त्याला शासन मान्यता प्राप्त पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून, नामनिर्देशित फलकांची उभारणी करणे व पर्यटकांसाठी आवश्यक त्या मुलभूत सुविधांची उपलब्धता करून त्या स्थळाचा विकास साधने गरजेचे आहे.

ज्यामुळे त्या-त्या परिसरातील अनेक लोकांना नौकरी, व्यवसाय व रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. पर्यायाने रिकाम्या हातांना काम मिळेल व निसर्गसौंदर्य अबाधित राहील आणि पर्यावरणाच्या संवर्धनासही हातभार लावता येईल. पिंपळसोंड येथील ’कुंदा रिसोर्ट’ व तुळशिराम खोटरे यांचं ’जंगल रिसोर्ट’ येथे येणारे बरेचसे पर्यटक साखळचौंड धबधबा पाहण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे स्थळाला चांगलीच प्रसिद्धी मिळत असल्याचे पाहून मनस्वी आनंद वाटतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या