Thursday, April 25, 2024
Homeनाशिकखाजगी संस्थांच्या मदतीने दुभाजक, वाहतुक बेटांचे सुशोभीकरण

खाजगी संस्थांच्या मदतीने दुभाजक, वाहतुक बेटांचे सुशोभीकरण

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

शहरातील रस्त्यांचे दुभाजक, वाहतुक बेटे, रस्त्यालगतचा फुटपाथ जवळील भाग यासह 141 ठिकाणी एकप्रेशन ऑफ इंटरेश अंतर्गत महापालिकेने ई-निवीदा काढली असतांना यासंदर्भात आलेले 8 प्रस्तावात स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

यानुसार आता दहा वर्षासाठी रस्ते दुभाजक, चौक व वाहतुक बेटे रॉयल्टी घेऊन सुशोभीकरणास मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाकडुन 15 आक्टोंबर 2020 रोजी शहरातील 141 वाहतुक बेट, चौक, रस्ते दुभाजक, रस्त्यालगतचा भाग यासह भागांचे सुशोभीकरण व देखभाल करण्यााठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेश अंतर्गत ई निवीदा काढण्यात आली होती.

सामाजिक दायीत्व म्हणुन खाजगी संस्थांना यातून आवाहन करण्यात आले होते. यात महापालिका क्षेत्रातील रस्ते चौक, दुभाजक आदींची नावे जाहीर करण्यात आले होते. यानंतर शहरातील खाजगी संस्थाकडुन याचे सुशोभिकरणाचे प्रस्ताव दाखल झाले होते. याची छाननी केल्यानंतर यातील 8 प्रस्तावांना अंतीम करण्यात आले होते.

यानंतर प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. यातून महापालिकेला 1 लाख 71 हजार रु. रॉयल्टी मिळणार आहे.

या मान्यतेनंतर शहरातील 8 ठिकाणचे सुशोभिकरण खाजगी संस्थाकडुन केले जाणार आहे. यात आययीआर सिग्नल ते पोस्ट ऑफिस (नामको बॅक), अंबढ पोलीस स्टेशन चौक (देवांग डेअरी), टिळकवाडी सिग्नल ते राजीव गांधी भवन (आय ओक आप्टीकल), गोदापार्क सर्व्हे नं. 28/1/2/1 (एबीएच डेव्हलर्प्स), बारदान फाटा ते बॉबीज हॉटेल रस्ता दुभाजक (एबीएच डेव्हलर्प्स), तलाठी कॉलनी वाहतुक बेट (साई बिल्डकॉन) व तलांठी कॉलनी शिवनगर पंचवटी रस्ता दुभाजक (साई बिल्डकॉन) अशा ठिकाणचा समावेश आहे.

आता ही ठिकाणे खाजगी संस्थाकडुन लवकर सुशोभित केली जाऊन शहराच्या सौदर्यात भर पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या