Friday, April 26, 2024
Homeजळगावभाजपाच्या पदाधिकार्‍याकडून पोलिसांना मारहाण

भाजपाच्या पदाधिकार्‍याकडून पोलिसांना मारहाण

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी –

शहरातील लोखंडवाला कॉम्पलेक्स समोर, अभिनव शाळेसमोर भडगाव रोड, येथेे हळदिच्या कार्यक्रमाचे ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला टेम्पो वाहन वरील स्पिकरबंद करण्याकरीता चाळीसगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस गेले असता. त्याना भाजपाच्या एका पदाधिकार्‍यांसह त्यांच्या साथीदाराकंडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. हि घटना दि. ९ रोजी रात्री उशिरा घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला तिघांविरोधात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांना थेट थक्का-बुक्की व मारहाण केल्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तर पोलिसांना जर मारहाण होत असेल तर आम जनतेची सुरक्षेचे काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

याबाबत चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोकों विजय अभिमन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार ते दि, ०९/०५/२०२३ रोजी रात्रगस्त ड्युटी करीत असताना, पिटर मोबाईल या शासकिय वाहनातुन पोकों. नरेंद्र किशोर चौधरी यांचेसह पो. स्टेशन हद्दीत गस्त करीत होते. त्यांना रात्री १२.१५ वा. पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी फोन करुन भडगाव रोड चाळीसगाव या परीसरात टेम्पोवर मोठे स्पिकर लावुन वाजवत असुन सदरचे स्पिकर बंद करणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे दोघे जण ताबडतोब भडगाव रोड येथे स्पिकर बंद करण्याकरीता शासकिय वाहनातून रवाना झालेत.

सदर परीसरात जावुन स्पिकरच्या आवाजावरुन शोध घेतला, टाकळी प्र.चा. हद्दीतील लोखंडवाला कॉम्पलेक्स समोर लग्नाचे हळदीचा कार्यक्रम सुरु होता व त्याठिकाणी टेम्पो वाहनावर (क्र. एमएच-०४ डीके ६६९७) स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे लावुन लोक नाचत होते. त्यावेळी पोकॉ नरेंद्र चौधरी हे स्पिकर बंद करण्याकरीता गाडीतून उतरुन पुढे निघाले, त्यावेळी पोकॉ.विजय अभिमन महाजन मदतीकरीता त्यांचेसोबत गेले.

टेम्पोवरील स्पिकर चालकास आम्ही दोघांनी स्पिकर बंद करणेबाबत सुचना केली व सदर टेम्पो वाहनाचा मालक व चालक कोण आहे. याबाबत विचारणा केली. तेव्हा कोणीही पुढे आले नाही, त्यावेळी पोलिसांनी तेथे उपस्थित असलेला भाजपाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी भावेश कोठावदे याचेकडुन स्पिकरचा टेम्पो कुणाचा आहे, याबाबत माहीती घेत असताना. त्याचवेळी स्पिकर बंद केल्याचे कारणावरुन तेथे नाचणार्‍या लोकांनी गर्दी करुन गोंधळ घातला. त्यावेळी गर्दीमधील लोखंडवाला कॉम्पलेक्स परीसरात राहणारे भाजपाचे पदाधिकारी तथा टाकळी प्र.चा.चेे माजी सद्या शाम नारायण गवळी उर्फ आण्णा गवळी याने स्पिकर बंद केल्याचे कारणावरुन पोकॉ. विजय महाजन यांच्याशी हुज्जत घालुन शासकीय गणवेशाची कॉलर पकडुन, तुम्ही स्पिकर बंद करायला येथे का आले असे बोलुन तुम्हाला मी स्पिकर बंद करु देणार नाही, असे बोलुन विजय महाजन यांनी धक्काबुक्की करुन, हाता चापटाने मारहाण केली.

त्यावेळी पोलिसांनी त्यास प्रतिकार केला. तेव्हा त्याचेसोबत असलेले अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयोगटातील दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करुन शिविगाळ केली. तेव्हा पोकॉ. विजय महाजन यांचा चष्मा खाली पडुन तुटला. त्यावेळी पोकॉ नरेंद्र चौधरी हे मदतीला आले असता, त्यांना देखील शाम नारायण गवळी उर्फ आण्णा गवळी व त्याचे सोबत असलेले दोन साथीदारांनी धक्काबुक्की करुन शिविगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी मदतीकरीता पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार पोहेकॉ पंकज पाटील यांना फोन करुन मदत पाठविणेबाबत कळविले. त्यानंतर काही वेळात आमचे मदतीला रात्रगस्त कर्तव्यावर असलेले पोकॉ.अमोल भोसले, पोकॉ. निलेश पाटील तसेच त्यांचेसोबत असलेले पोहेकॉ. योगेश बेलदार असे घटनास्थळी आले. त्यावेळी शाम नारायण गवळी उर्फ आण्णा गवळी व त्याचे दोन साथीदार यांनी आम्हाला धक्काबुक्की करुन मारहाण केलेबाबत सांगितले, त्यावेळी पोेलिसांनी त्या तिघांचा शोध घेतला असता ते गर्दीचा फायदा घेवुन तेथुन पळुन गेले होते.

त्यानंतर आम्ही त्याठिकाणी उपस्थित असलेला भावेश कोठावदे यास चौकशीकामी पोलीस स्टेशन येथे घेवुन आलो. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पोकों.विजय अभिमन महाजन यांच्या फिर्यादीवरून शाम नारायण गवळी उर्फ आण्णा गवळी व त्याचे सोबत असलेले दोन साथीदार यांच्याविरोधात शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून भा. द. वि. कलम ३५३, ३३२,५०४, ३४ प्रमाणे तसेच नमुद टेम्पो चालक (नाव पत्ता माहीत नाही.) याने विनापरवाना वाहनावर मोठे स्पिकर लावुन सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक शांतता भंग करुन मोठ्या आवाजात स्पिकर वाजवितांना मिळुन आल्याने सदर स्पिकर ठेवलेल्या टेम्पो चालक याचेविरुध्द महा. पोलीस कायदा कलम-३८/१३६ प्रमाणे गुुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या