Thursday, April 25, 2024
Homeनगरग्रामसेवकाला मारहाण ; आरोपीला एक वर्ष कारावास

ग्रामसेवकाला मारहाण ; आरोपीला एक वर्ष कारावास

अहमदनगर (प्रतिनिधी) –

ग्रामसेवकाला मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अरूण दादा रोकडे (रा. नवनागापूर) याला जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. एन. राव यांनी

- Advertisement -

दोषी धरून एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. रोकडे याने नवनागापूरचे ग्रामसेवक संजय विश्वनाथ मिसाळ यांना 17 सप्टेंबर 2018 रोजी शिवीगाळ करत मारहाण केली होती.

नवनागापूर ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी उगले यांनी 17 सप्टेंबर 2018 रोजी रोकडे लाईनला पाणी सोडले. यावेळी अरूण रोकडे हा उगले यांना म्हणाला, रोकडे लाईनला जादा पाणी सोडा. त्यावेळी रोकडे याने उगले यांच्याकडील पाणी सोडण्याचा पान्हा हिसकावून घेत स्वत: पाणी सोडले. सदर घटना सांगण्यासाठी उगले ग्रामपंचायतमध्ये आले. तेव्हा अरूण रोकडे तेथे आला.

त्यावेळी ग्रामसेवक मिसाळ यांनी रोकडे याला लेखी तक्रार देण्याचे सांगितले. रोकडे याने लेखी तक्रार न देता ग्रामसेवक मिसाळ यांची गचांडी धरून त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ग्रामसेवक मिसाळ यांच्या फिर्यादीवरून रोकडे विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील मोहन कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. त्यांना सहायक फौजदार ए. के. भोसले यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या