वीज पुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित केलाचा राग मनात धरून महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या कर्मचाऱ्याला एकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना

औरंगाबाद रोडवरील कविजंगनगरमध्ये घडली. मारहाण करणारा शेख जुबेर निसार (वय ४८ रा. कविजंगनगर, नगर) याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. महावितरणचे कर्मचारी सचिन दिलीप लिमकर (रा. नवनागापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे थकीत वीज बिल वसुलीच्या कर्तव्यावर असताना त्यांनी कविजंगनगर येथील साई अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर १०३ चे मालक शेख फयाज अब्दुल रेहमान यांचे वीज बिल थकल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला.

या फ्लॅटमध्ये रहात असलेला आरोपी शेख जुबेर निसार याने फिर्यादी यांना वीज पुरवठा खंडित का? केला असे म्हणत चापटीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझ्या नादी लागू नको, माझ्याकडे परवानाधारक बंदुक आहे. तुला आणि तुझ्या साहेबाला ठार मारून टाकील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार एस.व्ही.पानसरे करीत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *