Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकजागरूक व्हा! करोना टाळा! तुम्ही संपुर्ण कुटुबांच्या काळजी घ्या...

जागरूक व्हा! करोना टाळा! तुम्ही संपुर्ण कुटुबांच्या काळजी घ्या…

करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. करोना आणि सार्वजनिक वावरण्यावर घातलेले निर्बंध यासंदर्भात ‘देशदूत’ने कायमच सामाजिक भान राखून जनजागृती केली आहे. आताही करोनाच्या संसर्गातून बर्‍या झालेल्या व्यक्तींनी करोनाशी केलेला संघर्ष त्यांच्याच शब्दात. त्यांच्या अनुभवातून नक्कीच बोध घेता येईल..

करोना विषाणु साथीचा सर्वांना मोठा फटका बसला असुन अजुनही बसत आहे. या साथीच्या आजाराला सामोरे जातांना अनेक कटु अनुभव व अनामिक भितीने आपणास ग्रासले होते. आपल्यामुळे पत्नी, मुलगा, सुन असे संपुर्ण कुटुंबच करोनाग्रस्त झाल्याने एक नैराश्य निर्माण झाले होते. करोना बाधीत होण्यापुर्वीे जे आपण पाहिले – ऐकले यामुळे अधिक अस्वस्थता निर्माण झाली होती. बरे होण्यासाठी जे काही औषधे घेत होतो, यामुळे काही परिणाम तर होणार नाही ना ? अशी एक भिती होती. अनेक निगेटीव्ह विचार मनात येत असतांना सकारात्मक विचार केल्यानंतरच याचे चांगले परिणाम समोर आले. या मोठ्या संकटातून बाहेर पडल्यानंतर करोना संसर्ग टाळण्यासाठी असलेले सोपे उपाय किती महत्वाचे ठरतात, याची आठवण झाली. मला जो काही कटु अनुभव आला, संपुर्ण कुटुंबाला याचा त्रास झाला, असा अनुभव कोणालाच येऊ नये. यासाठीच कायम स्वरुपी चांगला मास्क वापरणे, कायम हात स्वच्छ करण्यासाठी सॅनेटाईजरचा वापर करणे आणि सोशल डिस्टसींगचा ठेवणे या सोप्या मार्गाचा कायम अवलंब केल्यास करोना संसर्ग टाळणे शक्यत आहे.

खा. हेमंत गोडसे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या