Monday, April 29, 2024
Homeनाशिक'नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना'

‘नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना’

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

आजच्या चंगळवादात जो कठोर परिश्रम (hard work) करेल त्याचे भविष्य उज्वल असून विद्यार्थ्यांनी (students) शालेय जीवनात उच्च ध्येय ठेवून वाटचाल करावी.

- Advertisement -

फक्त नोकरी (job) पुरते शिक्षण (education) घेण्यापेक्षा नोकरी देणारे बनून अनेकांचा आधार बना. खडतर परिश्रमानेच ध्येयापर्यंत पोहोचाल असे प्रतिपादन तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे (Taluka Cooperative Industrial Estate Chairman Namkarna Aware) यांनी केले.

बारागाव पिंपरी (Baragaon Pimpri) येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सहकारी औद्योगिक वसाहतीतर्फे (Cooperative Industrial Estate) विद्यालयास भावी उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन आवरे यांनी यावेळी दिले. शिक्षणाधिकारी मंगला कानवडे (Education Officer Mangala Kanwade) अध्यक्षस्थानी होत्या.

व्यासपिठावर प्राचार्य अशोक बागुल, उपप्राचार्य उदय देवनपल्ली, पर्यवेक्षक दत्तात्रय उगले, सीनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय फरताळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विजय उगले, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सुनीता पानसरे, सरपंच संध्या कटके, पाटपिंप्रीच्या सरपंच नंदा गायकवाड, उपसरपंच योगेश गोराडे, विकास संस्थेचे चेअरमन उत्तम उगले, गोरक्षनाथ जाधव, सुभाष गायकवाड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी भरपूर अभ्यास, मोबाईलचा अतिवापर टाळून विविध क्षेत्रात नाव कमवावे.

आजच्या काळात शिकेल तोच टिकेल म्हणून विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवून वाटचाल करावी असे आवाहन कानवडे यांनी केले. यावेळी वर्षभरात क्रीडा, सांस्कृतिक, बौद्धिक व इतर स्पर्धांमध्ये विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शालेय अहवाल वाचन मोहनदास पवार यांनी केले. सूत्रसंचालन विजय जाधव व मोनिका पानसरे यांनी केले. सचिन मोरे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या