Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याBDOने लाच मागितली; युवा सरपंचाने नोटाच उधळल्या

BDOने लाच मागितली; युवा सरपंचाने नोटाच उधळल्या

छत्रपती संभाजी नगर |Chhatrapati Sambhaji Nagar

समाज माध्यमांमध्ये सध्या एका तरुण सरपंचाचा (Sarpanch) व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये ते युवा सरपंच एका शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळताना दिसत आहे. ह्या नोटा उधळत असताना त्यांचा संतापही दिसत आहे.

- Advertisement -

ही घटना कुठली आहे? आणि या युवा सरपंचाचं नेमकं काय म्हणनं आहे हे ‘देशदूत’ ने समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समजले की, हा व्हिडिओ छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) च्या फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील आहे.

तर मंगेश साबळे (Mangesh Sable) असे या तरुण सरपंचाचे नाव आहे. येथील गटविकास अधिकाऱ्याने विहीर मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याने, या युवा सरपंचाने थेट त्यांच्या कार्यालयासमोर दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत, लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध केला आहे.

IAS अधिकाऱ्याच्या आजी-आजोबाने संपवली जीवनयात्रा, कारण ऐकून मन होते सुन्न

हे करत असताना त्या सरपंचाने गळ्यात नोटांचा हार घालत पंचायत समिती कार्यालयाच्या गेटवर पैसे उधळले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. “हे दोन लाख रुपये घ्या आणि गोर गरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या !” असे व्हिडिओमध्ये त्या सरपंचाने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत त्यांनी केलेल्या या अभिनव निषेध आंदोलनाची समाज माध्यमांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

PM मोदींची डिग्री शोधण्याचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाकडून रद्द, केजरीवालांना ठोठावला दंड

- Advertisment -

ताज्या बातम्या