Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा निवडणूक निकालांवर प्रशांत किशोरांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

विधानसभा निवडणूक निकालांवर प्रशांत किशोरांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…

दिल्ली | Delhi

देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election Result 2022) निकाल अखेर जाहीर झाले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यांमध्ये भाजपच्या (BJP) दणदणीत विजयानंतर पहिल्यांदाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Political strategist Prashant Kishor) यांचे विधान समोर आले आहे.

- Advertisement -

प्रशांत किशोर यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ‘भारताची लढाई २०२४ सालीच लढली जाईल आणि ठरवली जाईल. कोणत्याही राज्यांच्या निवडणूक निकालावर हे भवितव्य ठरणार नाही. मात्र, साहेबांना हे माहिती आहे. म्हणूनच या राज्यांच्या निकालाभोवती विजयी उन्माद तयार करुन विरोधकांवर मानसिक विजय प्रस्थापित करण्याचा हा एक चतुर प्रयत्न आहे. मात्र, या चुकीच्या फसवणुकीला बळी पडून नका तसेच याचा भागही होऊ नका!’

प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने लोकसभेसाठी तिसरी आघाडी बनवली जात असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर एक मोठी आघाडी बनवण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी असणाऱ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असं किशोर म्हणाले.

दरम्यान पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी २०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणारी आघाडी बांधता येईल असंही प्रशांत किशोर यांनी जानेवारी महिन्यामध्येच म्हटलं होतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांना थोडा समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. एका नवीन राष्ट्रीय पक्षाऐवजी राजकीय परिस्थितीबद्दल विचार करताना ‘थोडा बदल केल्यास’ हे शक्य आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या