Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात मिनी लॉकडाऊन; काय राहणार चालू, काय बंद?

पुण्यात मिनी लॉकडाऊन; काय राहणार चालू, काय बंद?

पुणे | Pune

करोनाचे संकट अद्यापही कायम असून राज्यातील काही शहरातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. काही शहरामध्ये अद्यापही लॉकडाउन सारखी….

- Advertisement -

परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान पुण्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली .

या बैठकीत पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परषद घेत नव्या निर्बधांसंदर्भात माहिती दिली.

काय सुरु, काय बंद?

बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार

हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार

पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद

सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी

अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी

इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी

संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार

अगोदर ठरलेल्या विवाह समारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी

सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स राहणार बंद

याशिवाय, आयुक्त सौरभ राव म्हणाले, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणं. आरोग्य सुविधा बळकट करणं, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे.

काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला १०० टक्के कोविड रूग्णालय म्हणून घोषित करावं लागेल. असही त्यांनी सांगितलं.

पुण्यात चाचण्या मोठ्या प्रमाणात होणार आहेत त्यामुळे रूग्णसंख्या वाढणार आहे. त्यामुळे लसीकरण देखील वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. 45 वर्षांवरील लोकांनी लसीकरणामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. कार्यालयं नियमित वेळेनुसारच सुरू राहतील असे सांगण्यात आले आहे. पोलिस देखील नियमांचं उल्लंघन करणार्‍यांना माणूसकीच्या दृष्टीने दंड देतील असे राव यांनी म्हटले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या