Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील "या" शहरात उद्यापासून पुन्हा लॉकडाऊन

राज्यातील “या” शहरात उद्यापासून पुन्हा लॉकडाऊन

बारामती | Baramati

काही दिवसात करोना मुक्त झालेल्या बारामतीत पुन्हा करोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून बारामतीतील करोना रुग्णांचा आकडा वाढूू लागल्याच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पुढील आदेश येईपर्यत बारामतीमध्ये कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासननाने घेतला आहे.

- Advertisement -

बारामतीमध्ये रविवारी तब्बल १८ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली होती. या बाधितांच्या संपर्कात असणाऱ्यांची करोना चाचणी घेतली असता आज पुन्हा नव्याने ५ करोना बाधितांची भर पडली आहे. बारामतीत दोन दिवसात २३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुढील काही दिवस बारामती पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून नगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गुरुवार दि 1५ पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या