Friday, April 26, 2024
Homeनगरबारागाव नांदूर ग्रामस्थांचा वाळू लिलावास विरोध

बारागाव नांदूर ग्रामस्थांचा वाळू लिलावास विरोध

बारागाव नांदूर |वार्ताहर| Baragav Nandur

पाण्याच्या पातळीत (Water Level) मोठ्या प्रमाणात घट, पर्यावरणाचा र्‍हास (Environmental Degradation), रस्त्यांची नासधूस, ग्रामपंचायतीला कोणताही फायदा नाही, अशा अनेक प्रश्नांमुळे बारागाव नांदूर (Baragav Nandur) येथे वाळू लिलाव (Sand Auction) संदर्भात घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेला ग्रामस्थांनी एकमताने विरोध दर्शविल्याने महसूल कर्मचार्‍यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

- Advertisement -

बारागाव नांदूर (Baragav Nandur) येथे शासनाच्या आदेशानुसार वाळू लिलाव (Sand Auction) घेण्यासंदर्भात दि. 27 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना सूचित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सकाळी दहा वाजता विशेष ग्रामसभा सरपंच सुरेखाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रास्ताविक मंडलाधिकारी सौ. सोनवणे यांनी करून मौजे बारागाव नांदूर येथे गटनंबर 445, 446, 447, 431 साठे एक, दोन, तीनमध्ये वाळू लिलाव (Sand Auction) करण्याचे शासनात प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी पूर्णतः विरोध दर्शविला.

यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजीराव पवार, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे इतरांनी गावाच्या वतीने विरोध दर्शविला. वाळू लिलाव झाल्यास त्याचे परिणाम गावकर्‍यांना भोगावे लागतात. पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट होते, असे अनेक प्रश्न प्रत्येकाने मांडले. गावाचा हा निर्णय शासन दरबारी कळवावा, असे कर्मचार्‍यांना सूचित करण्यात आले.

यावेळी कामगार तलाठी परते, ग्रामविकास अधिकारी गोसावी, कर्मचारी शिवाजी मंडलिक, संजय बाचकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या