Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबार असोसिएशनच्या निवडणुकीत 'इतके' मतदान झाले; उद्या मतमोजणी

बार असोसिएशनच्या निवडणुकीत ‘इतके’ मतदान झाले; उद्या मतमोजणी

नाशिक | Nashik

नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या (nashik district bar association) निवडणुकीत 79 टक्के मतदान झाले. 40 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत आज बंद झाले आहे. उद्या शनिवारी (दि ०७) रोजी सकाळी नऊपासुन मतमोजणी होणार आहे….

- Advertisement -

नाशिक जिल्हा वकील संघाच्या 11 जागासाठी आज मतदान झाले. सकाळी नऊपासुन मतदानास सुरवात झाली होती. सहा बुथची व्यवस्था करण्यात आली होती.

साठ वकीलांसह दहा कर्मचारी यांनी निवडणुक प्रक्रीया पार पाडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर 15 मिनटे वाढवून दिले. 2 हजार 767 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

शनिवारी (दि 7) सकाळी नऊला मतमोजणी सुरु होणार आहे. सायंकळी पाच पर्यंत जेवढी मतमोजणी होईल तेवढी झाल्यानंतर मोजणी थाांबवली जाईल.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मतमोजणी प्रारंभ होईल. आज दिवसभर उमेदवार ऍड. नितीन ठाकरे, महेश आहेर, अलका शेळके, प्रकाश अहुजा, वैभव शेटे, बाळासाहेब आडके, हेमंत गायकवाड, सुरेश निफाडे, शरद गायधनी, सईद सैय्यद, प्रवीण साळवे, संजय गिते,

शरद मोगल, चंद्रशेखर शिंदे, श्यामला दीक्षित, सोनल कदम, स्वप्ना राऊत, सोनल गायकर, रविंद्र चंद्रमोरे, कमलेश पाळेकर, हर्षल केंगे, संतोष जेथे, अनिल गायकवाड, महेश यादव, किरण बोंबलें, अनिल शर्मा, किशोर सांगळे,

प्रतीक शिंदे, अरुण दोंदे, मिलिंद कुरकुटे, अरुण खांडबहाले, दिलीप पिंगळे, वसीम सय्यद, सोमनाथ उगलमुगले, शिवाजी शेळके, अश्विनी गवते, कोमल गुप्ता, मयुरी सोनवणे, वैभव घुमरे व विशाल मटाले मतदानासाठी आवाहन करत होते.

3 हजार 464 पैकी 2 हजार767 एवढ्या वकिलांनी मतदान केले. निवडणुक समितीचे अध्यक्ष बिपीन शिंगाडा यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंत पाटोळे, अतुल गर्गे, कविता शर्मा, दतात्रेय भोसले, अर्चना शिंदे, तेजस्वीनी शिंदे, उत्तम काकड आदींनी काम पाहीले.

- Advertisment -

ताज्या बातम्या