Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमार्केट यार्डसमोर वडाचे झाड कोसळले; महिलेला वाचवले, मदतकार्य सुरु

मार्केट यार्डसमोर वडाचे झाड कोसळले; महिलेला वाचवले, मदतकार्य सुरु

पंचवटी | वार्ताहर Panchvati

पंचवटीतील दिंडोरी (Dindori road panchvati) रोडवर असलेल्या मार्केट यार्ड (APMC) समोर एका भले मोठे वडाचे झाड (banyan tree) कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एक धावती रिक्षा झाडाखाली दाबली गेली होती. रिक्षातून एका महिलेला वाचविण्यात यश आले आहे. घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली असून मदतकार्य सुरु आहे…(banyan tree collapsed near apmc dindori road nashik)

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड (APMC) समोरचे शेकडो वर्षे जुने असलेले वडाचे झाड अचानक कोसळले. याच वेळी एक प्रवासी रिक्षा काही प्रवाशांना घेऊन जात होती.

झाडाच्या फांद्यांमध्ये रिक्षा दाबली गेली आहे. या घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानाने रिक्षातील एका महिलेला वाचविण्यात आले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी ‘देशदूत’ला दिली.

घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्यामुळे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या बचाव कार्यात स्थानिकांनी कंबर कसली असून लवकरात लवकरच ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत.

घटनेनंतर तत्काळ अग्निशमन विभागाचे (Fire Dept) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पंचवटी पोलीसांचे (Panchvati police) अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. लवकरच याठिकाणची वाहतूक सुरळीत होणार आहे.

नाशिकमध्ये (nashik) या पावसाळ्यात अनेक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा शहरात मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेकांकडून ही झाडे त्वरित काढली जावीत अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या