Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकेवळ ‘अशा’ बँकांचेच खासगीकरण

केवळ ‘अशा’ बँकांचेच खासगीकरण

नवी दिल्ली –

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचार्‍यांनी सोमवारपासून पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या दुसर्‍या दिवशीही म्हणेजच

- Advertisement -

मंगळवारीही देशभरातील बँकांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारी बँकांचं अस्तित्व आहे आणि ते कायम राहील. सर्व सरकारी बँकांचं खासगीकरण केलं जाणार नाही. ज्या बँकांची कामगिरी चांगली होत नाहीय आणि पैसे जमा करणं शक्य होत नाहीय. केवळ अशाच बँकांचं खासगीकरण केलं जाईल आणि यात कर्मचार्‍यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल, असं स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे. सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचं खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली होती. या निर्णया बँक कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. दरम्यान, बँकांचं खासगीकरण करण्याचा निर्णय अतिशय विचारपूर्वकपणे केला गेला आहे. बँकांना आर्थिक बळ मिळावं आणि देशातील प्रत्येक बँकेकडून अपेक्षांची पूर्ताता व्हावी असा आमचा उद्देश आहे, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय बँक कर्मचार्‍यांच्या हिताचाच असल्याचा दावाही निर्मला सीतारामण यांनी केला आहे. ज्या बँकांच्या खासगीकरण होण्याची शक्यता आहे. अशा बँकांमधील प्रत्येक कर्मचार्‍याचं हित आणि सुरक्षा याचं रक्षण केलं जाईल. यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही सीतारामण म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या