उद्यापासून चार दिवस बँंका बंद

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मार्च एन्डची ( March End ) धावपळ सुरु असतानाच कर्मचा़र्‍यांच्या देशव्यापी संपामुळे ( Strike )सोमवारी व मंगळवारी राष्ट्रीयकृत बँंका ( Nationalised Banks )बंंद राहणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस सुटी असल्याने शनिवारपासूनच बँंका व्यवहार ठप्प होणार आहे.

त्यामुळे बँंकाशी संबंधीत कामे करण्यासाठी फक्त आज शुक्रवारचा दिवस शिल्लक आहे. कर्मचार्‍यांनी देशव्यापी संपाची हाक यापूर्वीच दिली आहे. संप होणारच असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक बँंकांचे खासगीकरण व बँक कायदा दुरुस्ती विधेयक 2021(Bank Law Amendment Bill 2021 ) विरोधात हा संप आहे. खासगी व सहकारी बँका संपात नाहीत. सध्या ऑनलाईऩ कारभाराचा जमाना असल्याने सर्वत्र एटीएममधून पैसै काढता येत असल्याने संपचा फार परिणाम जाणवत नाही.

मात्र सलग चार दिवस एटीएममध्ये पैसे भरले गेले नाही तर मात्र अडचण निर्माण होते. धनादेशाचे व्यवहार या काळात ठप्प होण्याची व शुक्रवारी बँंकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *