Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबँक सेवकांचा संप मागे

बँक सेवकांचा संप मागे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून (All India Bank Employees’ Association) देशव्यापी बँक संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्या देशभरातील बँका सुरु राहणार आहेत आणि त्यापुढेही कामकाजाच्या दिवशी बँका सुरु राहतील.

- Advertisement -

कर्मचार्‍यांच्या मागील 5 वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बँक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाकडून होकार देण्यात आला आहे. मुख्य कामगार आयुक्तां (केंद्र) सोबत बँक संघटनांच्या झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

आऊटसोर्सिंग आणि डमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बँकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही. सोबतच बँकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीनें करणार, कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचा बँकिंग संघटनांचा आरोप होता.

काही बँकांचे कर्मचार्‍यांसोबत असलेल्या वादावर देखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांनी पुढाकार दाखवला आहे. या चर्चेनंतर अखेर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून उद्यापासून पुकारण्यात आलेला संप मागे घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या