Friday, May 10, 2024
Homeनगरखासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी रस्त्यावर

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी रस्त्यावर

अहमदनगर (प्रतिनिधी) –

खासगीकरणाविरोधात नगरमध्ये बँक कर्मचारी सोमवारी रस्त्यावर उतरले. करोनाचे नियम पाळत त्यांनी कापड बाजारात

- Advertisement -

निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. सलग दोन दिवस बँकांचा बंद असल्याने कोट्यवधींचे व्यवहार थांबून असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

बँकांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला व बँकिंग सुविधा या सर्वसामान्यांना उपलब्ध झाल्या. मात्र, बँकांकडून कारखानदार व उद्योग घराण्यांना करण्यात आलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने ती कर्जे थकीत व बुडीत कर्जामध्ये समाविष्ट झाली. अनेकांची कर्जे राईट ऑफ करण्यासाठी बँकांच्या ढोबळ नफ्यातून तरतूद केल्यामुळे बँकांचा नफा वळता केल्यामुळे बँकांचा निव्वळ नफा कमी किंवा बँका तोट्यात असल्याचे दिसून येते.

त्याला बँक कर्मचारी व अधिकारी जबाबदार नसून सरकारी धोरण जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले. बँक कर्मचारी व अधिकारी संघटना वेळोवेळी कर्जबुडव्यांची नवे जाहीर करून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. सरकार मात्र, कर्जबुडव्यांना अभय देत आहे. बँकांच्या खाजगीकरणामुळे सर्वसामान्य जनता ही बँकिंग सेवेपासून वंचित होणार असून देशातील गरीब व दुर्बल घटक यांना ऋण मिळणे कठीण होणार आहे. बँकांच्या खाजगीकरणामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असून ती अस्थिर झाल्याशिवाय राहणार नाही.

सुरळीत असलेल्या बँकिंग उद्योगाला खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरुंग लावण्याचे प्रयत्न होत आहेत. सामान्य नागरिकांनी वेळीच भविष्यातील धोके लक्षात घेऊन सावध होणे गरजेचे असून बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या या लढ्याला पाठिंबा देऊन सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी हात बळकट करावेत, असे आवाहन करण्यात आले. सरकारने बँकांचे खाजगीकरण करू नये असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. बँक कर्मचारी व अधिकारी करोनाची सुरक्षितता बाळगून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांतिलाल वर्मा, उल्हास देसाई, माणिक अडाणे, उमाकांत कुलकर्णी, महादेव भोसले, सुजय नळे, सुजित उदरभरे, आशुतोष काळे, विशाल सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या