Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशबँकेत पैसे भरणे- काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क

बँकेत पैसे भरणे- काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क

नवी दिल्ली

आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून याची सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

बँक ऑफ बडोदा (BoB) नेही याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग सेवेचा वापर केल्यास वेगळी फी आकारली जाणार आहे. १ नोव्हेंबरपासून ग्राहक कर्ज खात्यातून महिन्यात तीन वेळा पैसे काढू शकतील. त्याहून जास्त वेळा व्यवहार केल्यास दीडशे रुपये द्यावे लागणार आहेत, बचत खात्याविषयी बोलायचे झाल्यास अशा खातेदारांना तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहक चौथ्यांदा पैसे जमा करत असतील तर त्यांना ४० रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी जन धन खातेदारांना यातून थोडा दिलासा मिळाला आहे, त्यांना जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर कोणतीही फी भरावी लागणार नाही, परंतु पैसे काढताना १०० रुपये द्यावे लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या