Friday, April 26, 2024
Homeक्रीडाबांगलादेश-इंग्लंड एकदिवसीय मालिका उद्यापासून

बांगलादेश-इंग्लंड एकदिवसीय मालिका उद्यापासून

ढाका | Dhaka

इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (England vs Bangladesh) संघांमधील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (ODI series) उद्या १ मार्च २०२१ पासून ढाका येथे सुरुवात होणार आहे. हा सामना ढाका येथील शेर ए बांगला क्रिकेट मैदानावर दुपारी २ वाजता खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

बांगलादेश संघाचे नेतृत्व तमिम इकबालकडे असणार आहे. तर इंग्लंड संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरकडे असणार आहे. इंग्लंड संघाची २०२१३ या वर्षाची सुरवात निराशाजनक झाली आहे. इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मालिकेत २-१ असा पराभव स्वीकारावा लागला आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया येथील टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलिया संघाने ३-० असे पराभूत केले होते.

ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचे नीलम गोऱ्हेंना पत्र

या दोन्ही मालिकेतील पराभव विसरून बांगलादेश संघाविरुद्ध २ हात करण्यासाठी इंग्लंड संघ जोस बटलरच्या नेतृत्वात विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे नियमित कर्णधार तमिम इकबाल याच्या अनुपस्थितीत लिटन दासच्या नेतृत्वात यजमान बांगलादेश संघाने भारतीय संघाला २-१ असं पराभूत केले आहे. आता इंग्लंडला नमवून नवीन वर्षातील आपली पहिली मालिका खिशात टाकण्यासाठी बांगलादेश सज्ज असणार आहे.

Elon Musk अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा टॉपला; अदानी किती नंबरला?

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मालिकाविजय साकारल्यामुळे बांगलादेश इंग्लंड संघाला मालिकेत पराभूत करण्यासाठी उत्सुक असणार आहे. इंग्लड संघाला बांगलादेश संघाविरुद्ध सावध खेळ करावा लागणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पंतप्रधानांचे बंधू प्रह्लाद मोदी रुग्णालयात दाखल

या मैदानावर एकूण ११४ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५४ तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ६० सामन्यात विजय संपादन केला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या