Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधकेळ्याचं झाड या दिशेला नको

केळ्याचं झाड या दिशेला नको

सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पती दैवी गुणांनी परिपूर्ण मानल्या जातात. ती झाडे लावण्यासाठीचे नियम आणि निश्चित निर्देशही शास्त्रात सांगण्यात आले आहेत. त्या नियमांचं उल्लंघन करून झाडं लावली तर जीवनात नुकसान सहन करावं लागतं, असं सांगितलं जातं. केळीचं झाड लावण्यासाठी योग्य दिशा आणि नियम काय आहेत हे जाणून घेऊया.

केळीच्या झाडात भगवान विष्णूंचा वास – ज्योतिषशास्त्रानुसार, केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती निवास करतात. ज्या घरात केळीचं झाड लावलं जातं त्या घरामध्ये समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांना संपत्ती आणि चांगलं आरोग्य मिळतं. मात्र, केळीचे झाड चुकीच्या दिशेने लावल्यास अनेक प्रकारच्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. त्यामुळे केळीचे झाड लावण्यापूर्वी त्याच्या योग्य दिशेची माहिती घ्यावी, अन्यथा जीवनात नुकसान सहन करावं लागतं.

- Advertisement -

मुख्य दारासमोर झाड लावू नका – सनातन धर्म ग्रंथानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर केळीचं झाड लावणं टाळावं. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश थांबतो. यासोबतच घरातील सदस्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचं कारण बनतं. शिवाय घरात आर्थिक समस्याही सुरू होतात.

या दिशेला झाड लावणं टाळावं – वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला केळीचं झाड लावा. त्याची दिशा कधीही पूर्व-दक्षिण या आग्नेय दिशेत म्हणजेच मध्यभागी असू नये. त्याचप्रमाणे घराच्या पश्चिम दिशेला केळीचं झाड लावणं टाळावं. असं केल्याने अशुभ परिणाम मिळू लागतात आणि घरात अनेक विचित्र गोष्टी घडू लागतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या