Friday, April 26, 2024
Homeजळगावकेळी व्यापार्‍याची फसवणूक करणार्‍यास पोलीस कोठडी

केळी व्यापार्‍याची फसवणूक करणार्‍यास पोलीस कोठडी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील एका केळी व्यापार्‍याची दहा लाख 20 हजार रुपयांत फसवणूक करणार्‍या संशयितास शहर पोलीसांनी

- Advertisement -

मुंबईतून अटक केली असून, त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील जुने बसस्थानकाजवळील मल्हारा मार्केटमधील केळी व्यापारी शालीस दौलत सोनवणे यांचे केला सप्लायर्सचे दुकान आहे.

ते शेतकर्‍यांकडून मालाची खरेदी करुन माल परराज्यात पाठवित असतात. मुंबईतील कांदीवली येथे राहणारा व्यापारी संतोष गुप्ता याच्याशी त्यांनी असाच फोनवरुन व्यवहार केला होता.

दरम्यान सोनवणे यांनी व्यवहारानंतर माल पाठविला. एकूण 37 लाख 82 हजार 542 रुपयांचा माल पाठविल्यानंतर गुप्ता याने 27 लाख 61 हजार 600 रुपये इतकी रक्कम सोनवणे यांना पाठविली मात्र उर्वरीत रकमेची मागणी केल्यानंतर गुप्ता याने टाळाटाळ केली.

याप्रकरणी सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्ता यास मुंबई येथून अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या